मुंबई | यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची भर रस्त्यात हत्या झाली. आता सुपारी देऊनच ही हत्या घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.
आरोपी ज्येष्ठ पत्रकार बाळ ज. बोठे आणि सागर भिंगारदिवे या दोघांनी आरोपी आदित्य चोळके यास सुपारी दिली. त्यानंतर चोळके याने फिरोज शेख आणि ज्ञानेश्वर शिंदे यांना ही सुपारी दिली. याचबरोबर सुपारीमधील ६ लाख २० हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आल्याचेही पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
आरोपी ज्येष्ठ पत्रकार बाळ ज. बोठे आणि सागर भिंगारदिवे या दोघांनी आरोपी आदित्य चोळके यास सुपारी दिली. त्यानंतर चोळके याने फिरोज शेख आणि ज्ञानेश्वर शिंदे यांना ही सुपारी दिली. याचबरोबर सुपारीमधील ६ लाख २० हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आल्याचेही पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
एका आरोपीच्या मदतीने सुपारी देऊन बोठे यांनीच ही हत्या घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. बोठे फरारी असून अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. घराची झडती घेतली असून, काही वस्तू जप्त करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
पुणे ते नागपूर भाजप भूईसपाट! विधान परिषदेत महाविकासआघाडीचा डंका
विधानपरिषदेतील दारूण पराभवानंतर चंद्रकांत पाटील म्हणतात; हिंमत असेल तर…
रेखा जरे ह.त्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; ज्येष्ठ पत्रकारानेच दिली सुपारी!