‘बाळ बोठेने लाॅजचं दार उघडताच म्हटलं, मी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, अजिबात गडबड करायची नाही’

मुंबई : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. रेखा जरे यांच्या हत्येनंतर जवळपास साडेतीन महिन्यांपासून तो फरार होता.

बाळ बोठेला अटक करणाऱ्या पोलिसांचा अहमदनगरमध्ये सत्कार करण्यात आला. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रशस्तीपत्र देऊन पोलीस अधिकारी आणि टीमचं अभिनंदन केलं. यावेळी बोठे पोलिसांना कसा चकवा द्यायचा, बाळ बोठेला पकडताना कसा एखाद्या चित्रपटाप्रमाणे थरार रंगला होता, याचा अनुभव टीम प्रमुखांनी सांगितला.

याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सांगतात, “आम्हाला संशय असलेला लॉज पाहिला. तिथे रजिस्टरमध्ये बाळ बोठेचं नाव सापडलं. आम्ही खुश झालो. पण तितक्यात रुमची चावी तिथेच दिसली. त्यामुळे हा रुमला लॉक करुन बाहेर गेला की काय, असा संशय आला. मात्र तो एका रुमला लॉक लावून दुसऱ्या रुममध्ये लपून बसला होता.” असे यादवांनी सांगितले.

दरम्यान, “आम्हाला खात्री पटताच आधी गेट लॉक केला. कर्मचाऱ्याने बाळ बोठेचा दरवाजा वाजवला. पाच सेकंदात त्याने दरवाजा उघडला, मी पटकन आत शिरुन म्हटलं, ‘मी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, अहमदनगरहून आलोय…’ गडबड करायची नाही. त्यानंतर बाकीचे पोलीस कर्मचारीही घटनास्थळी आले” असे यादव यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

जसप्रित बुमराह अडकला विवाहबंधनात, पहा त्याच्या लग्नातील सुंदर फोटो

“डिलिव्हरी बॉय निर्दोष असल्याची मला खात्री”, झोमॅटो बॉय प्रकरणात परिणीती चोप्राची उडी

“भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीरामाप्रमाणे देव मानून त्यांची पूजा केली जाईल”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.