यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या करण्यात आली. पारनेर तालुक्यातील जतेगाव फाट्याजवळील घाटात त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली. त्यांना तातडीने अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

रेखा जरे कुटुंबियांसोबत काल संध्याकाळी पुण्याहून काम उरकून नगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा, सून, त्यांची आई देखील होते. या दरम्यान कारची काच एका दुचाकीला लागल्यामुळे वाद झाला. या वादातून रेखा जरे यांच्या मानेवर वार करण्यात आल्याची माहिती त्यांच्या मुलाने दिली.

नगर जिल्ह्यात महिलांच्या सबलीकरणासाठी विविध स्तुत्य उपक्रम या संघटनेच्या माध्यमातून त्या राबवत होत्या. महिलांच्या विविध प्रश्नांची तड लावण्यासाठी वेळोवेळी या संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. महिलांवरील अन्यायाविरुद्धही आंदोलने करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही रेखा जरे सक्रिय होत्या.

जरे पाटील या जतेगाव घाटात असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रेखा जरे यांना काही वेळातच नगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. तसे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. रेखा जरे यांच्याबाबत माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली.

३२ वर्षांपूर्वी! कॉंग्रेस सरकारला झुकवणाऱ्या रांगड्या नेत्याच्या एक हाकेने जमा झाले होते लाखो शेतकरी

धक्कादायक! गर्भवती महिला टॉयलेटला गेली आणि गर्भातून अचानक निघालं बाळाचं डोकं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.