राष्ट्रवादीच्या रेखा जरेंच्या हत्येबद्दल धक्कादायक माहिती उघड; हत्येची दिली होती सुपारी

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची भर रस्त्यात हत्या झाली. यामुळे अहमदनगरमध्ये खळबळ उडाली होती. रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. आता सुपारी देऊनच ही हत्या घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे.

राहता तालुक्यातील कोल्हार परिसरात मंगळवारी रात्री दोघांना तर कोल्हापूर येथून एकाला अटक झाली. अटक केलेल्या तिघांमध्ये दोन कोल्हार येथील तर एक केडगाव येथील आरोपी आहे. सुपारी देऊनच ही हत्या घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींकडून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता असून सूत्रधार नगर शहरातील असल्याचे समजते.

अहमदनगर जिल्ह्यातल्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. पारनेर तालुक्यातील जातेगाव इथल्या घाटात हल्लेखोरांनी रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली होती.

घटनेची गंभीरता पाहता पोलिसांनी तातडीने या प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथकांची नियुक्ती केली आहे. रेखा जरे यांच्या खून प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

#coronavirus : कोरोनापासून बचावासाठी ‘हा’ नियम पाळावाच लागणार; घ्या जाणून

‘झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार; मित्रांचं उत्पन्न झालं चौपट, शेतकऱ्यांचं मात्र अर्ध’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.