मुलाचे नाव रेखासोबत जोडल्या गेल्यामूळे सुनील दत्तची उडाली होती झोप; वाचा पुर्ण किस्सा

बॉलीवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा त्यांच्या सुंदरतेमूळे आणि अभिनयामूळे जेवढ्या चर्चेत असतात. तेवढ्याच चर्चेत त्या वैयक्तिक आयूष्यामूळे असतात. रेखाचे अनेक लव्ह अफेअर्स चर्चेत होते. जास्त करुन तर त्यांचे नाव विवाहीत पुरुषासोबतच जोडण्यात आले. त्यामूळे त्यांना होम ब्रेकरचा टॅग मिळाला होता.

आज रेखा ७० वर्षांच्या झाल्या आहे. पण तरीही कोणत्या ना कोणत्या कारणामूळे त्या नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या लव्ह स्टोरीचे किस्से आजही प्रसिद्ध होतात. फक्त अमिताभ बच्चनच नाही तर जितेंद्र, धर्मेंद्र, राज बब्बर, विनोद मेहरा, अक्षय कुमारसोबत देखील रेखाचे अफेअरचे किस्से खुप प्रसिद्ध झाले होते.

सर्वात जास्त चर्चा तर रेखा आणि संजय दत्तच्या अफेअरची झाली होती. पाच वर्ष मोठ्या रेखासोबत मुलाचे नाव जोडल्यामूळे सुनील दत्तची रात्रीची झोप उडाली होती. त्यांना स्वत ला या विषयात लक्ष घालावे लागले होते. तेव्हा कुठे संजय आणि रेखाच्या अफेअरच्या बातम्या बंद झाल्या होत्या.

हा किस्सा १९८४ चा. त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये नवीन असणारे संजय दत्तच्या त्यांच्या यशाला एन्जॉय करत होते. त्यांना युवा स्टार म्हणून ओळखले जाऊ लागले होते. त्यावेळी संजय रेखासोबत ‘जमिन आसमान’ चित्रपटामध्ये काम करत होते. चित्रपटात संजय रेखाच्या मुलाची भुमिका करत होते.

पण खऱ्या आयूष्यात मात्र दोघांच्या जवळकीने सर्वांना शॉक केले होते. रेखा संजय पेक्षा पाच वर्षांनी मोठ्या होत्या. पण तरीही दोघांमध्ये खुप चांगली मैत्री झाली होती. ते सेटवर नेहमी एकत्र दिसू लागले. एवढेच नाही तर थोड्याच दिवसांमध्ये त्यांनी पब्लिकली एकत्र फिरायला सुरुवात केली.

काही दिवसांमध्ये रेखा आणि संजयच्या बातम्या इंडस्ट्रीमध्ये आगीप्रमाणे पसरु लागल्या. ही बातमी सुनील दत्त आणि नर्गिसपासून जास्त काळ लपू शकली नाही. रेखासोबत मुलाचे नाव जोडल्या गेल्यामूळे सुनील दत्तची रात्रीची झोप उडाली होती. त्यांना काहीही करुन ह्या बातम्या थांबवायच्या होत्या.

म्हणून सुनील दत्तने संजयला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संजयला रेखापासून दुर राहायला आणि आपल्या करिअरवर लक्ष द्यायला सांगितले. नेहमीप्रमाणे संजय मात्र वडीलांचे काहीही न ऐकता निघून गेला. याच काळात रेखा आणि संजयच्या लग्नाच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या.

बोलले जात होते की, रेखा आणि संजयने मंदिरात जाऊन लग्न केले आहे. ही बातमी ऐकल्यानंतर तर सुनील दत्त रागाने लाल झाले होते. त्यांना मुलाच्या लग्नाच्या बातम्या ऐकून काहीही कळत नव्हते. त्यांना समजले की, आत्ता संजयसोबत बोलून काही फायदा नाही. त्यांना रेखासोबत बोलावे लागेल.

ह्या अफेअरच्या बातम्या थांबल्या नाही तर खरचं एके दिवशी रेखा आणि संजय लग्न करतील. अशी भीती सुनील दत्तला वाटू लागली. म्हणून त्यांनी रेखासोबत बोलण्याचा निर्णय घेतला. ते रेखाच्या चित्रपटाच्या सेटवर गेले आणि त्यांनी रेखाला संजयपासून दुर राहण्याची राहायला सांगितले. नाही तर तुझे करिअर खराब करेल अशी धमकी दिली.

सुनील दत्तचा राग पाहून रेखाने संजयपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला. तिने संजयसोबत ब्रेकअप केले. पण तरीही त्यांच्या अफेअरच्या बातम्या येत होत्या. म्हणून शेवटी संजय दत्तने एक प्रेस नोट जाहिर करुन त्याच्या आणि रेखाच्या अफेअरच्या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले.

महत्वाच्या बातम्या –
वयाच्या ७० व्या वर्षी देखील फिट राहण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी ‘हे’ काम करते रेखा
या अभिनेत्रीमुळे करण जोहर राहिला अविवाहीत, आता ती आहे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी
…म्हणून मीनाषी शेषाद्रीने ‘दामिनी’ चित्रपटानंतर एकही चित्रपट साईन केला नाही
त्रिदेव, विश्वात्मा चित्रपटांमध्ये आपल्या बोल्ड सीन्सने लोकांना घायाळ करणारी अभिनेत्री आज करते ‘हे’ काम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.