१८ वर्षावरील नागरीकांना लसीसाठी २८ एप्रीलपासून नोंदणी करावी लागणार; जाणून घ्या कशी करायची नोंदणी..

नवी दिल्ली | देशात कोरोना लसीकरणाबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. देशात १८ वर्षांवरील लोकांना कोरोनावरील लस घेण्यासाठी २८ एप्रिलपासून नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.

याआधी २४ एप्रिल पासून नोंदणी सुरू होणार अशी माहिती समोर येत होती. मात्र केंद्र सरकारकडून २८  एप्रिल पासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

१८ ते ४५ वर्ष वयोगटातील लोकांना नोंदणी केल्याशिवाय लस देण्यात येणार नसल्याचंही सांगण्यात आलं आहे. नोंदणी केल्यानंतर १ मे पासून १८ ते ४५ वर्ष वयोगटातील लोकांना लस देण्यास सुरूवात होणार आहे.

आतापर्यंत जशी नोंदणी करण्याची पध्दत होती. त्याचप्रमाणेच नोंदणी करावी लागणार आहे. कोविन वेबसाईटवर जाऊन किंवा आरोग्य सेतू अॅपवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करण्यासाठी नाव, मोबाईल नंबर, ओळखपत्र, जन्मतारीख यांची माहिती द्यावी लागणार आहे.

त्यानंतर जवळचे लसीकरण केंद्र निवडावे लागणार आहे. मग आपला ज्या दिवशी नंबर आहे. त्या दिवशी लस घ्यायला जावंं लागणार आहे. १ मे पासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात झाली होती..

पहिल्यांदा देशात आरोग्य कर्मचारी, अग्रभागी कर्मचाऱ्यांना लस दिली गेली. त्यानंतर १ मार्च रोजी ४५ वर्षांवरील लोकांना कोरोना लस देण्याची परवानगी दिली. आता तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४५ वयोगटातील सर्वांना कोरोना लस घेता येणार आहे.

दरम्यान ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनूसार देशातील कोरोना रुग्णसंख्या १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ इथवर जाऊन पोहोचली आहे. गेल्या २४ तासामध्ये देशात २,१०४ कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. सध्या देशात अॅक्टिव्ह रूग्ण संख्या २२ लाख ९१ हजार ४२८ आहे.
महत्वाच्या बातम्या-
कितीही मोठे संकट येऊद्या रतन टाटा मदतीसाठी तत्पर, देवमाणूस म्हणून होतेय कौतुक
८५% पेशंटना रेमडेसिवीरची गरज नसते पण तरीही डाॅक्टर वापरतात; एम्सच्या तज्ञांची धक्कादायक माहिती
ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पुढाकार घेणाऱ्या रतन टाटांचे न्यायालयाकडून कौतूक; केंद्राला मात्र झापले

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.