Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

अमेरीकेत रस्त्यावर ठेवलेत फ्रिज; कुणीही या आणि काहीही घेऊन जा, पुर्णपणे मोफत

July 22, 2020
in इतर, ताज्या बातम्या
0
कोरोनाच्या संकटात हा फ्रीज देतोय मायेचा थंडावा; २४ तास असतो भरलेला, काहीही घेऊन जा!
ADVERTISEMENT

लॉस एंजेलिस। जगात कोरोना महामारीने कहर केला आहे. अशात अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये रस्त्यांवर मोठे-मोठे फ्रिज ठेवण्यात आले आहेत. त्या फ्रिजमध्ये दूध, फळं, भाज्या, चिकन आणि इतर काही सामान ठेवण्यात आले आहे.

या फ्रिजमधून ज्या व्यक्तीला जे काही गरजेचे हवे आहे ते तो घेऊ शकतो. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. लॉस एंजेलिसमध्ये अशाप्रकारचे अनेक कम्युनिटी फ्रिज ठेवण्यात आले आहेत.

कोरोना व्हायरसमुळे आर्थिक फटका बसलेल्या गरजू लोकांच्या मदतीसाठी हे कम्युनिटी फ्रिज ठेवण्यात आले आहेत. या कम्युनिटी फ्रिजमधून हव्या त्या वस्तू घेण्यासाठी कोणतीही लाईन लावावी लागत नाही, की कोणताही फॉर्म भरावा लागत नाही.

या फ्रिजला कोणतेही लॉक लावण्यात आलेले नाही. हे फ्रिज २४ तास गरजूंच्या मदतीसाठी उपलब्ध असून कोणीही गरजू व्यक्ती यातून आवश्यक असलेल्या वस्तू घेऊ शकते.

लॉस एंजेलिस कम्युनिटी फ्रिजच्या आयोजक मॅरिना वर्गरा यांनी सांगितले की, “जर एखाद्याला फ्रिजमध्ये ठेवलेल्या संपूर्ण सामानाची गरज असेल, तर तो ते सर्व घेऊ शकतो. संपूर्ण सामान घेतल्याबद्दल त्याला कोणीही काही बोलू शकत नाही.

एखाद्या व्यक्तीला गरजूंसाठी या फ्रिजमध्ये काही सामान ठेवायचे असेल, तर तेदेखील लोक यासाठी मदत करु शकतात”. पुढे त्या म्हणाल्या की, “लॉस एंजेलिसच्या रस्त्यांवर अशाप्रकारचे ७ फ्रिज लावण्यात आले असून त्यांना रचनात्मकरित्या रंग देण्यात आले आहेत.

अधिकाधिक गरजू लोकांना मदत करणे, हा यामागचा उद्देश आहे”. बेघरांसाठी काम करणार्‍या ‘रीच फॉर दी टॉप’ या संस्थेच्या सहकार्याने वर्गरा यांनी फ्रिजची कल्पना अंमलात आणली. वर्गरा यांना अशाप्रकारचे अनेक फ्रिज ठेवायचे आहेत.

परंतु बर्‍याच समुदायांमध्ये असा विश्वास आहे की, यामुळे त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहचू शकते. अनेकांना फुड बँकेत जाण्यासाठी लाज वाटते, त्याशिवाय स्थलांतरितांनी येथून निर्वासित होण्याची भीती देखील आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.

Tags: Community FreezeCovid १९Food BankKorona effectLos AngelesMarina VargaraPeople in NeedReach for the Top Institutionsusaअमेरिकाकम्युनिटी फ्रीजगरजू व्यक्तीफूड बँकमॅरिना वर्गरारीच फॉर दी टॉप संस्थालॉस एंजेलिस
Previous Post

धक्कादायक! परीक्षा देणारे विद्यार्थीच निघाले कोरोना पॉझिटिव्ह: ६०० पालकांवर गुन्हे दाखल

Next Post

शिवसेनेच्या नेत्याने राणे पिता-पुत्रांना दिली लाल तोंडाच्या माकडाची उपमा

Next Post
शिवसेनेच्या नेत्याने राणे पिता-पुत्रांना दिली लाल तोंडाच्या माकडाची उपमा

शिवसेनेच्या नेत्याने राणे पिता-पुत्रांना दिली लाल तोंडाच्या माकडाची उपमा

ताज्या बातम्या

खुप वाईट होता बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीचा शेवट; गळा दाबून करण्यात आली होती हत्या

खुप वाईट होता बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीचा शेवट; गळा दाबून करण्यात आली होती हत्या

February 26, 2021
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, माहेरच्या लोकांना संपत्ती देण्याचा महिलांना हक्क

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, माहेरच्या लोकांना संपत्ती देण्याचा महिलांना हक्क

February 26, 2021
शाहरुख खानच्या सर्वात मोठा दुश्मन आहे ‘हा’ व्यक्ति आणि सुहाना त्याच्याच प्रेमात झाली आहे पागल

शाहरुख खानच्या सर्वात मोठा दुश्मन आहे ‘हा’ व्यक्ति आणि सुहाना त्याच्याच प्रेमात झाली आहे पागल

February 26, 2021
ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारीला मृत्यूनंतर मृत्यूच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या; कारण ऐकूण धक्का बसेल

ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारीला मृत्यूनंतर मृत्यूच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या; कारण ऐकूण धक्का बसेल

February 26, 2021
जिल्ह्यातील तब्बल ९९६ मुली प्रियकरासोबत पळाल्या, विवाहित महिलांचा आकडा ऐकून बसेल धक्का

जिल्ह्यातील तब्बल ९९६ मुली प्रियकरासोबत पळाल्या, विवाहित महिलांचा आकडा ऐकून बसेल धक्का

February 26, 2021
सिद्धार्थच्या प्रेमात पागल झाली होती विद्या बालन; काहीही विचार न करता बनली तिसरी बायको

सिद्धार्थच्या प्रेमात पागल झाली होती विद्या बालन; काहीही विचार न करता बनली तिसरी बायको

February 26, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.