गेल्या लोकसभा निवडणुकीत(Loksabha Election) एका महिला निवडणूक अधिकारीचे पिवळ्या साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे ही महिला निवडणूक अधिकारी खूप चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही महिला निवडणूक अधिकारी चर्चेत आली आहे.(reena divedi new look viral )
या महिला निवडणूक अधिकारीचे नाव रीना द्विवेदी(Reena Devidi) असे आहे. त्या उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथील रहिवाशी आहेत. त्यांना शहरातील मोहनलालगंज विधानसभा मतदारसंघात ड्युटी देण्यात आली आहे. २०१९मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी रीना द्विवेदी यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर(Social Media) व्हायरल झाले आहेत.
त्या फोटोमध्ये रीना द्विवेदी यांनी पिवळी साडी नेसली होती. त्यांच्या एका हातात मतदानाचे मशीन देखील होते. या फोटोंमुळे रीना द्विवेदी यांची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. आता उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचे तीन टप्पे पूर्ण झाले असून आज चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे. त्याआधीच रीना द्विवेदी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
यावेळी देखील महिला निवडणूक अधिकारी रिना द्विवेदी यांचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये रिना द्विवेदी यांचा गेटअप पूर्णपणे बदलला आहे. यावेळी रिना द्विवेदी यांनी ब्लॅक स्लिव्हलेस टॉप आणि ऑफ व्हाईट ट्राउझर परिधान केला होता. तयांनी डोळ्यांवर काळा चष्मा देखील घातला आहे.
महिला निवडणूक अधिकारी रिना द्विवेदी यांच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रीना द्विवेदी लखनऊच्या PWD विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. रीना द्विवेदी यांना एका मुलगा आहे. रीना द्विवेदी त्यांच्या फिटनेसबाबत नेहमीच जागरूक असतात. रीना द्विवेदी यांच्या पतीचे २०१३ मध्ये आजारपणामुळे निधन झाले आहे.
2004 मध्ये त्यांचा विवाह PWD विभागात कार्यरत असलेले वरिष्ठ सहाय्यक संजय द्विवेदी यांच्याशी झाला होता. रिना द्विवेदी यांचे इंस्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि समाजवादी पार्टी हे प्रमुख पक्ष आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
शरद पवारांनी सरकारला दिला कानमंत्र, म्हणाले; टीका करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका, धाडसाने..
योगींच्या रॅलीमध्ये शेतकऱ्यांनी सोडले शेकडो गाय आणि बैल? ‘त्या’ व्हिडीओमागचे सत्य आले समोर
‘हम झुकेंगे नही, डरेंगे नही, हम लडेंगे और जितेंगे’; अटकेनंतर नवाब मलिकांनी फोडली डरकाळी