Share

Pratik Shinde Accident : रीलस्टार प्रतिक शिंदेचा भिगवणमध्ये अपघात, भरधाव फॉर्च्युनरची क्रेटाला धडक, तीन गाड्यांचा चुराडा अन्….

Pratik Shinde Accident : गुरुवारी सायंकाळी पुणे-सोलापूर महामार्गावर मदनवाडी (Madanwadi Village) परिसरात झालेल्या अपघाताने मोठी खळबळ उडाली. या धडकेत तीन गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले असून लाखो रुपयांची हानी झाली. सुदैवाने जीवितहानी टळली. हा अपघात ‘रील स्टार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रतीक राम शिंदेच्या (Pratik Ram Shinde) भरधाव फॉर्च्युनर गाडीमुळे झाल्याचं समोर आलं आहे.

महिनाभरापूर्वी घेतलेली फॉर्च्युनर ठरली अपघाताचं कारण

भादलवाडी (Bhadalwadi Village, Indapur) येथील प्रतीक शिंदेने अवघ्या महिनाभरापूर्वी दिमाखात टोयोटा फॉर्च्युनर (MH 42 BS 0111) खरेदी केली होती. मात्र गुरुवारी हीच गाडी अपघाताचं कारण ठरली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील बाळासाहेब होले (Nikhil Holay) आपल्या क्रेटा कारने महामार्गावरून जात असताना शिंदेच्या फॉर्च्युनरने जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की क्रेटा पुढे असलेल्या मारुती व्हॅगनरवर आदळली. परिणामी तीनही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.

अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी

धडक झाल्यानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. पोलिसांनीही तातडीने हस्तक्षेप करत वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. तरीदेखील नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली. “फिल्मी स्टाईलमध्ये गाडी चालवणारे असे तरुण सामान्यांच्या जीवाशी खेळत आहेत. अशा निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.

प्रतीक शिंदेविरुद्ध गुन्हा दाखल

भिगवण पोलिसांनी प्रतीक शिंदेविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि इतरांच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

मुंबईत दुसरा धक्कादायक अपघात

दरम्यान, मुंबईतील घाटकोपर (Ghatkopar Mumbai) परिसरातील एलबीएस रोडवरही भरधाव कारचा अपघात झाला. बॅरिकेटिंग तोडून कार फुटपाथ ओलांडत थेट दुकानाच्या कठड्यावर आदळली. यात दोन तरुणी आणि एक तरुण गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, तिघेही मद्यधुंद अवस्थेत होते. विशेष म्हणजे अपघातानंतर कार चालक रिक्षातून पळून गेला, तर दोन्ही तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now