मुंबई | ठाकरे सरकारने राज्यातील अनेक बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. फडणवीस यांच्याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे.
भाजप नेत्यांमध्ये कपात केल्याने भाजपाने ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला होता. शरद पवार यांनी ‘माझी सुद्धा सुरक्षा कमी करा’ अशी मागणी केली आहे.
‘माझ्या सुरक्षेत कपात करावी’ अशी मागणीच केली आहे. ‘इतर नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे, तर माझी सुद्धा सुरक्षा कमी करावी’, अशी मागणी पवार यांनी केली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकमध्ये याबद्दल निर्णय घेण्यात आला आहे.
‘या’ नेत्यांना पुरवण्यात आली सुरक्षा..
काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर,दिलीप वळसे, शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना झेड सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तर शत्रुघ्न सिन्हा यांना वाय प्लस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांना प्रथमच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तसेच कोल्हापूरमध्ये माजी आमदार राजेश क्षीरसागर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवल यांची सुरक्षा वाढवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
फडणवीसांच्या सुरक्षा कपातीवरून भाजपाचा गंभीर आरोप, ‘हे कोत्या मनोवृत्तीचे राजकारण’
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंसह ‘या’ नेत्यांच्या सुरक्षेत मोठी कपात
राज्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव? ‘या’ जिल्ह्यात २८ कोंबड्या दगावल्या…