काय सांगता! लाल भेंडीची लागवड करून शेतकरी झाला मालामाल, किंमत पाहून तुम्हीही थक्क व्हाल

शेती करून यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम जिद्द आणि चिकाटीची गरज असते. आपल्या देशात असे अनेक शेतकरी आहेत जे कृषी क्षेत्रात आदर्श बनून आहेत आणि त्यांनी कृषी क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

असाच एक आदर्श बनले आहेत भोपाळमध्ये राहणारे मिश्रीलाल राजपूत. यांनी त्यांच्या शेतीत लाल भेंडीची लागवड करून तिप्पट नफा मिळवला आहे. कारण या भेंडीला बाजरात सामान्य भेंडीपेक्षा जास्त भाव मिळत आहे. या भेंडीची किंमत बाजारपेठेत ३०० ते ४०० रूपये प्रति २५० /५०० ग्रॅम इतकी आहे. म्हणजे ८०० रुपये प्रति किलो असा भाव या भेंडीला बाजारात मिळत आहे.

मिश्रीलाल राजपूत यांनी सांगितले की, वाराणसी येथील कृषी संशोधन संस्थेकडून १ किलो बियाणे जवळपास २४०० रुपयांना खरेदी केले. जुलै महिन्यात या बियाणांची लागवड केली आणि सुमारे ४० दिवसात, ते वाढू लागले.

लाल भेंडीच्या लागवडीदरम्यान कोणत्याही हानिकारक कीटकनाशकांचा वापर केला गेला नाही. एक एकर जमिनीवर किमान ४०-५० क्विंटल आणि जास्तीत जास्त ७०-८० क्विंटल लागवड करता येते. तसेच सामान्य भेंडीपेक्षा लाल भेंडी लवकर तयार होते.

बाजारात लाल भेंडीची किंमत जास्त आहे कारण लाल भेंडी स्वादिष्ट आणि पौष्टिक असते. ही लाल भेंडी हिरव्या भेंडीपेक्षा अधिक फायदेशीर आणि पौष्टिक आहे. हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह,यांसारख्या अनेक आजारावर अत्यंत फायदेशीर आहे.

लाल भेंडीमध्ये लोह, मॅग्नेशिअम, कॅल्शिअमसह अशा इतर अनेक पौष्टिक घटकांचे प्रमाण अधिक असते त्यामुळे लाल भेंडी आरोग्यासाठी उत्तम असते, असं मिश्रीलाल राजपूत सांगतात. मिश्रीलाल यांनी शेतकऱ्यांना आणि तरुणांना ही संदेश दिला की, जे शेती सोडून इतर क्षेत्राकडे जात आहेत, ते शेतीलाही उत्पन्नाचे उत्तम साधन बनवू शकतात.

 

महत्वाच्या बातम्या
पुनर्विवाहानंतरही विधवेला पतीच्या संपत्तीमध्ये अधिकार; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
पोटच्या पोरीला मारून दांपत्याने स्वतः केली आत्महत्या, घटनेने राज्यात खळबळ
“नाव वाघ असलं म्हणून मांजर वाघ होत नाही अन् अशा ५६ चित्रा वाघ आल्या तरी मी त्यांना घाबरत नाही”
सापाची शेपूट पाहून अंदाजा लावू नका; पहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.