आता तृतीयपंथी BSF आणि CRPF मध्ये होणार भरती; भरतीबाबत दोन्ही दलांनी दिली परवानगी

 

नवी दिल्ली | BSF (सीमा सुरक्षा दल) आणि CRPF (केंद्रीय रिजर्व्ह पोलीस दल) च्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला तृतीयपंथी व्यक्तींना केडर असिस्टंट पदावर भरती करू असं सांगितलं आहे.

तृतीयपंथी समाजाला देशात आणि समाजात स्थान मिळावे म्हणून गेल्यावर्षी तृतीयपंथीयांच्या सुरक्षेचा कायदा म्हणजे ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट काढण्यात आला होता.

यालाच अनुसरून CRPF आणि BSF च्या अधिकाऱ्यांनी तृतीयपंथीयांच्या भरतीबाबत गृह मंत्रालयाला सांगितले आहे. CRPF मध्ये पहिल्यापासूनच जेंडर न्यूट्रल वर्क वातावरण आहे.

याबद्दल डायरेक्ट जनरल ए. पी. माहेश्वरी यांनी सांगितले की, “आम्ही एमएएचच्या गाईडलाईन्स आमच्या गरजेनुसार पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो”.

“तृतीयपंथीयांच्या भरतीबाबत आम्हाला काहीच अडचण नाही. याबाबत आम्ही निमलष्करी दलासोबत बोलू”, असं बीएसएफचे डायरेक्ट जनरल एस. एस. देसवाल म्हणाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.