केंद्र सरकारकडून भारतीय सैन्यात मोठी भरती जाहीर! १.७७ लाखांपर्यंत पगार, जाणून घ्या…

मुंबई । सध्या कोरोनामुळे बेरोजगारीचे प्रमाण अधिक वाढले आहे. अनेक तरुण- तरुणी नोकरीच्या शोधात आहेत. यातच आता आपण अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असेल तर भारतीय सैन्यात आपल्याला नोकरीची उत्तम संधी मिळणार ​​आहे.

यासाठी कोणत्याही शाखेतून बीई किंवा बीटेक करणारे तरुण त्यासाठी अर्ज करू शकतात. Joinindianarmy.nic.in वर अर्ज करण्यासाठी काही वेळ शिल्लक राहिलेला आहे. यामुळे सरकारी नोकरीसाठी हा एक मोठा पर्याय आपल्याला उपलब्द झाला आहे.

ही भरती शॉर्ट सर्व्हिस कमिशन तांत्रिक कोर्सअंतर्गत करण्यात येत आहे. यामध्ये मुला-मुली दोघांनाही संधी मिळणार आहे. रिक्त पदांचे तपशील, अधिसूचना आणि ऑनलाईन अर्ज यांची माहिती मिळण्यासाठी लिंक देण्यात आली आहे.

यामध्ये एकूण 191 जागा आहेत. तसेच वेतन हे दरमहा 56,100 रुपये ते 1,77,500 रुपये दरमहा पर्यत देण्यात येणार आहे. इतर सोयी सुविधा देखील यामध्ये देण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाशी संबंधित शाखेतून अभियांत्रिकी विषयात पदवीधर असावा.

तसेच उमेदवारांचे वय किमान 20 आणि जास्तीत जास्त 27 वर्षे असावे. राखीव वयोगटांना यामध्ये जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये सवलत मिळणार आहे. रिक्त पदासाठी, एखाद्याला जॉइन इंडियन आर्मीच्या वेबसाइट joinindianarmy.nic.in च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज आपल्याला करावा लागेल.

अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2020 पासून सुरू आहे. 12 नोव्हेंबर 2020 पर्यंत लागू होऊ शकेल. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे. या अभ्यासक्रमासाठी पात्र उमेदवारांची निवड शारीरिक पात्रता परीक्षा (PET), मुलाखत आणि वैद्यकीय परीक्षेच्या आधारे केली जाईल.

यामुळे नोकरीची ही एक मोठी संधी चालून आली आहे. यामध्ये आपल्याला सरकारी नोकरी भेटणार आहे. यामुळे तरुणांनी याचा फायदा करून घेतला पाहिजे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.