Share

SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

SBI :  नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आली आहे. भारतीय स्टेट बँक (State Bank of India) येथे विशेष अधिकारी पदांसाठी (Specialist Cadre Officers) भरती जाहीर झाली असून एकूण 33 जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

रिक्त पदांची माहिती

या भरती अंतर्गत खालीलप्रमाणे पदे उपलब्ध आहेत —

  1. जनरल मॅनेजर (IS ऑडिट) – 01 जागा

  2. असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (IS ऑडिट) – 14 जागा

  3. डिप्युटी मॅनेजर (IS ऑडिट) – 18 जागा

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र. 1 – जनरल मॅनेजर :

    • B.E./B.Tech (Computer Science, Information Technology, Electronics इ.) किंवा MCA/M.Tech/M.Sc. (संगणक शाखा व इलेक्ट्रॉनिक्स संबंधित शाखा)

    • किमान 15 वर्षांचा अनुभव आवश्यक

  • पद क्र. 2 – असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट :

    • 50% गुणांसह B.E./B.Tech (Computer Science, Software Engineering, IT, Electronics)

    • 06 वर्षांचा अनुभव आवश्यक

  • पद क्र. 3 – डिप्युटी मॅनेजर :

    • 50% गुणांसह B.E./B.Tech (Computer Science, Software Engineering, IT, Electronics)

    • 04 वर्षांचा अनुभव आवश्यक

वयोमर्यादा

  • अर्जदाराचे वय 25 ते 55 वर्षे दरम्यान असावे.

  • राखीव प्रवर्गासाठी सूट : SC/ST – 05 वर्षे, OBC – 03 वर्षे

परीक्षा फी

  • सामान्य व ओबीसी उमेदवारांसाठी : ₹750/-

  • SC/ST/PWD उमेदवारांसाठी : फी नाही

पगार श्रेणी

  • ₹64,820-2340/1-67160-2680/10-93,960/- (अनुभवानुसार वेगवेगळा)

नोकरीचे ठिकाण

  • मुंबई (Mumbai) व हैदराबाद (Hyderabad)

अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज फक्त ऑनलाईन करावा लागेल.

  • अर्जाची शेवटची तारीख – 07 ऑगस्ट 2025 आहे.

महत्त्वाच्या लिंक

ताज्या बातम्या व्यवसाय

Join WhatsApp

Join Now