आयपीएलमधले गेल्या १२ वर्षातले सर्वाधीक महत्वाचे सहा विक्रम; एक तर कधीच मोडू शकत नाही

इंडियन प्रीमियर लीग २०२० आजपासुन सुरु होत आहे. दरम्यान, आयपीएलच्या १२ वर्षांच्या इतिहासात फलंदाजांच्या माध्यमातून अनेक मोठे पराक्रम पाहिले गेले. आयपीएलच्या काळात अनेक खेळाडूंनी सर्वाधिक वेळा १५ किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारले आहेत. चला तर मग जाणुन घेऊयात हे वेगवेगळे विक्रम कोणाच्या नावावर आहेत.

सर्वाधिक षटकांरांचा विचार केला तर 357 षटकारांसह एबी डिव्हिलियर्स प्रथम क्रमांकावर असून गेल 323 तर धोनीने 297 षटकार लगावले आहेत. तसेच सर्वाधिक धावांमध्ये आरसीबीचा कर्णधार विराट कोहली हा 5 हजार 412 रन बनवून प्रथम स्थानावर आहे. तर सुरेश रैना याने 5 हजार 368 धावा केल्या असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अमित मिश्रा याने सर्वाधिक तीन वेळा हॅटट्रीक नोंदवली आहे. मिश्राने 147 सामन्यात 3 हॅटट्रीक घेतल्या आहेत. तसेच सुपर ओव्हरचा प्रत्येक सामना थरारक झाला आहे. गेल्या बारा वर्षात आठ सामने सुपर ओव्हरपर्यंत गेले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने सर्वाधिक तीन सुपर ओव्हर सामने खेळले आहेत. चेन्नई आणि कोलकात्याला यात एकही विजय नोंदवता आलेला नाही.

सर्वाधिक विकेटमध्ये लसिथ मलिंगा याने सर्वाधिक 170 बळी घेतले आहेत. त्यानंतर अमित मिश्रा (157) आणि हरभजन सिंग (150) यांचा क्रमांक लागतो. तर एल. राहुलच्या नावावर अवघ्या 14 चेंडुत अर्धशतक करण्याचा विक्रम आहे. नंतर युसूफ पठाण आणि सुनील नारायण यांचा क्रमांक लागतो.

मुंबईच्या अल्जारी जोसेफ याने हैद्राबादविरुद्धच्या सामन्यात 3.4 ओव्हरमध्ये 12 धावा सहा बळी घेऊन विक्रम नोंदवला आहे. सोहेल तनवरने 14 धावा देत विकेट घेतल्या होत्या. तसेच सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आरसीबीच्या नावावर आहे. आरसीबीने 2013 मध्ये पुणे वॉरियर्स विरोधात 263 धावा केल्या होत्या.

ख्रीस गेल हा आयपीएलचा विक्रमादित्य म्हणून ओळखला जातो. सर्वाधिक सहा शतके, पुणे वॉरियर्स विरुद्ध 66 चेंडूत 175 धावांची नाबाद मोठी खेळी असे काही मोठे विक्रम त्याच्या नावावर आहेत. तर आजपर्यंतच्या IPL 2017 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सला मुंबईने तब्बल 146 धावांनी पराभूत केले होते. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे.

प्रविण कुमार याच्या नावावर सर्वाधिक 14 मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम आहे. तर इरफान पठाणनं 10 आणि धवन कुलकर्णीने 8 मेडन ओव्हर टाकले होते.

असे आहेत गेल्या १२ वर्षातले आयपीएलचे विक्रम.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.