मोठी बातमी! पूजा चव्हाण प्रकरणातील ‘ते’ कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती? राठोड यांच्या अडचणीत वाढ

पुणे । पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पुणे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला आहे. या पुराव्यामुळे माजी मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पोलिसांना २२ वर्षीय पूजाच्या मोबाईलमधून अनेक कॉल रिकॉर्डिंग आढळून आले आहेत.

यात पूजा आणि कथितरित्या माजी मंत्री संजय राठोड यांचे संभाषण आहे. हे कॉल पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या आधी पाच-सहा दिवसांपूर्वी करण्यात आले होते. त्यातील एक संभाषण जवळपास ९० मिनिटाचे असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे.

पूजा चव्हाणशी फोनवर बोलणारा व्यक्ती संजय राठोड असल्याचे समजत आहे. पूजाने सर्व कॉलचे रिकॉर्डिंग केली आहे. संभाषण बंजारा भाषेमध्ये झाले होते. पोलीस या संभाषणाचे ट्रान्सलेशन करुन घेत आहेत. संजय राठोड ज्या बंजारा समाजातून येतात, त्याच समाजातून पूजा चव्हाण येते.

पोलिसातील सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भातील माहिती दिली. पूजा बीडची असून ती पुण्यामध्ये एक कोर्स करत होती. तिचे आणि आमदार राठोड यांचे प्रेमसंबंध होते असा आरोप आहे. कॉल रिकॉर्डिंग असलेला पूजा चव्हाणचा फोन पुण्यातील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवण्यात आला आहे.

पूजा चव्हाणने ७ फेब्रुवारीला पुण्यात राहत्या इमारतीवरुन उडी मारली होती. त्यात तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव सातत्याने घेतले जात होते. भाजपने या मुद्द्यावरुन संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

प्रकरण तापल्याने राठोड यांनी २८ फेब्रुवारीला राजीनामा दिला होता. त्यानंतर पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहेत. पोलिसांच्या हाती अनेक महत्त्वाचे पुरावे लागल्याचे समजत आहे.

ताज्या बातम्या

आयुष्याची नव्याने सुरुवात करणार मंदिरा बेदी; पतीच्या निधनानंतर पोस्ट शेअर करत म्हणाली…

दुधात भेसळ आहे की नाही हे घरबसल्या ओळखू शकतात तुम्ही; काही मिनिटांतच कळेल भेसळयुक्त आहे की शुद्ध

नोराच्या ‘जालिमा कोका कोला’ ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद! तीनच दिवसात पार केला तीन कोटी व्ह्युजचा टप्पा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.