शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगत आहे.(Rebel Rajesh Kshirsagar threatens those who tear posters)
शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील शिवसैनिकांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर शिवसैनिक बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी शिवसैनिकांकडून आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी शिंदे गटात सामील झालेले माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर फाडले आहे. तसेच माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पोस्टरला शिवसैनिकांकडून काळं फासण्यात आलं आहे. या घटनांवरून माजी आमदार राजेश क्षीरसागर संतापले आहेत. त्यांनी पोस्टर फाडणाऱ्या शिवसैनिकांना थेट इशारा दिला आहे.
शिंदे गटातील माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरचे माजी शहराध्यक्ष रवीकिरण इंगवले आणि इतर शिवसैनिकांबद्दल राग व्यक्त केला आहे. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये शिंदे गटातील माजी आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले की, “बिलकुल दम नसणारा हा गुंड आहे. गैरफायदा घेऊन माझे पोस्टर फाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला मी इशारा देतोय की तू गुंड असशील तर मी सुशिक्षित गुंड आहे. रेकॉर्डिंग-रेकॉर्डिंगचे खेळ बंद कर. पोस्टर फाडणाऱ्यांना सोडणार नाही”, असे राजेश क्षीरसागर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.
माजी आमदार राजेश क्षीरसागर व्हिडिओमध्ये पुढे म्हणाले की, “माझ्यासारखा सुशिक्षित गुंड बाहेर पडला तर तुला पळता भुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही. वैयक्तिक द्वेषाचा फायदा कुणी घेत असेल, शिवसेनेचं नुकसान होत असेल तर यांना पाठीशी घालू नका. शिवसेना मी सोडलेली नाही. आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत. हा एकनाथ शिंदेंचा पठ्ठा आहे. तुला सोडणार नाही मी एवढं लक्षात ठेव”, असे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
आम्हाला परत यायचय, आमच्यासाठी उद्धवजींकडे मध्यस्थी करा; बंडखोर आमदाराचा शिवसेना नेत्याला फोन
“आमची गुवाहाटीमधून सुटका करा, आम्हाला मदत करा”; बंडखोर आमदाराचा चंद्रकांत खैरेंना फोन
बंडखोर आमदार म्हणजे डुकरं – संजय राऊत