शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे आणि सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत.(Rebel MLAs ordered to come to Mumbai with bags)
शिंदे गटातील एका आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये बंडखोर आमदार गुवाहाटीमधील निसर्गाचे वर्णन करत आहे.
“काय ते झाडी, डोंगर आणि हॉटेल, एकदम झकास सुविधा आहे”, असे बंडखोर आमदार आपल्या कार्यकर्त्याला फोनवरून सांगत आहे. पण आता या या सर्व बंडखोर आमदारांना बॅग भरून मुंबईला येण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मिळत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सक्रिय झाल्यामुळे सर्व बंडखोर आमदार मुंबईला येणार असल्याचे सांगितले होते. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोना झाला होता. त्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण आता भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी लवकरच राजभवनावर दाखल होणार आहेत. शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार ४८ तासांत गुवाहाटीहून मुंबईला येणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्या रात्रीपर्यंत सर्व आमदार मुंबई विमानतळावर येणार आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विशेष अधिकार वापरून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटाने वकिलांची एक विशेष टीम देखील निवडली आहे. वकिलांची ही विशेष टीम न्यायालयात एकनाथ शिंदे यांच्या गटाची बाजू मांडणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाची एक महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत शिंदे गटाची पुढील रणनिती आखण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनेकडून अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून या निर्णयाला विरोध दर्शवण्यात आला आहे. विधानसभा उपाध्यक्षांनी याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता हा वादावर राज्यपाल तोडगा काढणार असल्याची माहिती मिळत आहे. काल शिवसेनेच्या कार्यकारिणीची देखील बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या :-
एकनाथ शिंदेंच्या दरे गावात शाळा, रुग्णालय नाही, पण दोन हेलिपॅड; जाणून घ्या गावच्या स्थितीबाबत
शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचे झाले स्पष्ट, धक्कादायक माहिती आली समोर
गावात शाळा, रुग्णालय नाही, पण दोन हेलिपॅड; एकनाथ शिंदेंच्या दरे गावाची चर्चा