Share

संजय राऊतांनी कधी एक ढेकुण तरी मारला आहे का? बंडखोर आमदार संजय शिरसाठांचा टोला

शिवसेनेचे बंडखोर नेते आणि आमदार संजय शिरसाठ(Sanjay Shirsath)यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “संजय राऊतांचा मोठ्या मोर्चातील एक तरी फोटो दाखवा. या लोकांनी कधी एक ढेकुण तरी मारला आहे का?”, अशा शब्दांत आमदार संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. एका मुलाखतीत शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी आमदारांच्या नाराजीमागचे कारण सांगितले आहे.(Rebel MLA Sanjay Shirsath statement about Sanjay Raut)

शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाठ मुलाखतीत म्हणाले की, “मुख्यमंत्री असूनही उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नव्हते. निवेदने देऊनही काहीच कार्यवाही व्हायची नाही. मुख्यमंत्र्यांनी तुमच्या निवेदनावर काहीच आदेश दिले नसल्याचं अधिकारी सांगायचे. त्यामुळे आमच्या मतदारसंघातील कामे होत नव्हती. पण दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील आमदारांची कामे व्हायची”, असे बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी सांगितले.

शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाठ मुलाखतीत पुढे म्हणाले की, “कधीही झेंडा हातात न घेतलेले आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. ३७ वर्षे शिवसेनेत खूप चांगलं काम केलं. आज प्रवक्ते बाजू मांडतात ते नवीन आले आहेत. आम्ही लढून शिवसेना जनसामान्यात रुजवली आहे”, असे बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी मुलाखतीत सांगितले.

बंडखोर आमदार संजय शिरसाठ मुलाखतीत म्हणाले की, “संजय राऊत सकाळी उठून पत्रकार परिषदा घेतात. संजय राऊतांचा मोठ्या मोर्चातील एक तरी फोटो दाखवा. या लोकांनी कधी एक ढेकुण तरी मारला आहे का? आमच्यासोबतच्या चार महिलांना हे लोक वेश्या म्हणतात. असं बोलणाऱ्यांना लोक जोड्याने मारतील”, अशा शब्दांत आमदार संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

“मतदार संघातील काम होत नसल्यामुळे आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागला. मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नव्हता. उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या लोकांनी साहेबांची दिशाभूल केली. बंडखोरी होऊ नये असे आम्हाला शेवटपर्यंत वाटतं होतं. पण आम्हाला कोणीच समजून घेतलं नाही”, असे आमदार संजय शिरसाठ यांनी मुलाखतीत सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली होती. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. त्यानंतर भाजपने शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गुप्त भेटी कशा व्हायच्या? अमृता फडणवीसांचा मोठा खुलासा
PHOTO: ‘या’ गावात जन्माला आलं अनोखं बाळ; गावकरी म्हणाले, ‘हा तर देवाचा अवतार’
उद्धव ठाकरेंच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली थेट पवारांची भेट; व्हायरल फोटोंमागील सत्य घ्या जाणून…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now