Share

आम्हाला परत यायचय, आमच्यासाठी उद्धवजींकडे मध्यस्थी करा; बंडखोर आमदाराचा शिवसेना नेत्याला फोन

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. सध्या हे सर्व आमदार गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. शिवसेनेचे काही आमदार गुवाहाटीमधून पळून देखील आले आहेत. बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी शिंदे गटाकडून आपलं अपहरण करण्यात आलं होतं, असा आरोप केला होता.(Rebel MLA calls Shiv Sena leader)

एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या गटातील काही आमदारांना परत शिवसेनेत यायचे आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी काल प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बंडखोर आमदारांचे सुटकेसाठी फोन येत असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलत असताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना बंडखोर आमदार रमेश बोरनारे यांनी फोन केला होता. “हॉटेलमधील जेवण पचत नाही. तुम्ही शिवसेनेत परत या. वाटलं तर मी मध्यस्थी करतो”, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर आमदार रमेश बोरनारे यांना सांगितले.

यावेळी बंडखोर आमदार रमेश बोरनारे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडे गुवाहाटीमधून सुटका करण्याची मागणी केली. “आमची गुवाहाटीमधून सुटका करा. आम्हाला मदत करा”, असे बंडखोर आमदार रमेश बोरनारे यांनी चंद्रकांत खैरेंना फोनवरून सांगितले. त्यावर चंद्रकांत खैरे म्हणाले की, “मी सर्वांना मदत करणार नाही. मी आपल्याच माणसांना मदत करणार.”

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे पुढे रमेश बोरनारे यांना फोनवर म्हणाले की, “बाकीचे नाही तुम्ही परत कधी येत ते सांगा. हॉटेलमधील जेवण पचत नाही. तुम्ही शिवसेनेत परत या. वाटलं तर मी मध्यस्थी करतो. मी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्याकडे घेऊन जातो”, असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. शिवसेनेतून फुटल्यावर वाईट अवस्था होते, असे देखील चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर आमदार रमेश बोरनारे यांना फोनवर सांगितले.

“तुम्हाला लोकांनी निवडून दिले आहे. शिवसेनेच्या नावावर तुम्हाला मतदान मिळाले आहे. यामध्ये तुमची देखील मेहनत आहे. पण तुम्हाला ओळख शिवसेनेमुळे मिळाली आहे. लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे. शिवसेनेसोबत बंडखोरी करणारे पुढे कुठेच दिसत नाहीत. तुम्ही माझे चेले आहात. तसेच माझे मित्र देखील आहात. कधी येता ते फोन करून सांगा”, असे चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर आमदार रमेश बोरनारे यांना फोनवर सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-
“आमची गुवाहाटीमधून सुटका करा, आम्हाला मदत करा”; बंडखोर आमदाराचा चंद्रकांत खैरेंना फोन
बंडखोर आमदार म्हणजे डुकरं – संजय राऊत
पक्षविरोधी कारवाया केल्या तरी आमदार अपात्र होतात, विधीमंडळ व्हिपची गरजही नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now