‘या’ कारणामुळे मी अक्षय कुमार सोबत काम करू शकत नाही, शाहरुख खानचा मोठा खुलासा

मुंबई । बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांच्या चाहत्यांची इच्छा असती की, त्यांच्या आवडत्या अभिनेत्यांनी सोबत काम कारावे. त्यांच्या आवडत्या अभिनेत्यांनी किंवा अभिनेत्रींनी एकाच चित्रपटात काम कारावे, अशी मागणी अनेक चाहते नेहमी करत असतात.

बॉलिवूडमधील सुपरस्टार शाहरुख खान आणि अक्षय कुमार दोघेही चाहत्यांच्या मनावर राज करत असतात. एकाला रोमान्स किंग म्हणतात, तर दुसऱ्याला बॉलिवूडचा ऍक्शन स्टार म्हटले जाते. शाहरुख आणि अक्षय दोघेही आपल्या अनोख्या शैलीसाठी ओळखले जातात. या दोघांना एकाच चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

परंतु त्यांनी ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही असे स्वतः शाहरुख खानने सांगितले आहे. त्याने अक्षयसोबत काम करण्याचे कारण ही स्पष्ट केले आहे. शाहरुखने एका मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केले. त्यावेळी त्याने अक्षय कुमारसोबत काम न करण्याचे कारण सांगितले आहे.

शाहरुख म्हणाला, अक्षय खूपच शिस्तप्रिय अभिनेता आहे. तो खूप लवकर उठतो आणि मी उशीरा उठतो. माझा दिवस जेव्हा सुरु होतो तेव्हा अक्षय झोपण्याची तयारी करत असतो. आमच्या जगण्याच्या वेळा परस्पर विरुद्ध आहेत. त्यामुळे आमची भेट कधीही होत नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही कधी एकत्र काम करु असे वाटत नाही.

अक्षय आणि शाहरुखने ‘दिल तो पागल है’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात अक्षयने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. १९९७ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट जबरदस्त गाणी आणि स्टार कास्टमुळे तुफान गाजला होता. मात्र यानंतर पुन्हा कधीही अक्षय आणि शाहरुख यांनी एकत्र काम केले नाही. मात्र ते दोघे आता काम करू शकत नाही, हे एकूण त्यांच्या चाहत्यांना मात्र धक्काच बसला असेल.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! टीआरपी घोटाळा प्रकरणी आरोपपत्र सादर, अर्णब गोस्वामी आरोपी घोषित

स्म्रिती मंधानाच्या ‘त्या’ फोटोवर चाहते घायाळ, म्हणाले, बॉलिवूड अभिनेत्री पेक्षा…

दीपिका पादुकोनला का वाटते राहुल गांधींनी पंतप्रधान व्हावे? जाणून घ्या काय म्हणाली दीपिका..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.