Homeताज्या बातम्याबिपिन रावतांच्या हेलिकॉप्टरचा अपघात कसा झाला? अखेर सत्य आले समोर

बिपिन रावतांच्या हेलिकॉप्टरचा अपघात कसा झाला? अखेर सत्य आले समोर

गेल्या वर्षी ८ डिसेंबर रोजी झालेल्या सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या साथीदारांचा हेलिकॉप्टर अपघात झाला होता. पण हा अपघात नसून यामागे षड्यंत्र असल्याचे म्हटले जात होते. पण आता ट्राई-सर्विसेज कोर्ट ऑफ इंक्वायरीने सादर केलेल्या प्राथमिक निष्कर्षांमध्ये, अनपेक्षित हवामानातील बदलांमुळे वैमानिकाची दिशाभूल झाली, ज्यामुळे हा अपघात झाला आहे, असे म्हटले आहे. भारतीय हवाई दलाने ही माहिती दिली.

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत आणि अन्य १३ जण तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ एका अपघातात शहीद झाले होते. हवाई दलाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की एमआय-१७ व्ही ५ च्या क्रॅशसंदर्भात ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ने यांत्रिक बिघाड किंवा निष्काळजीपणा नाकारला आहे.

८ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या एमआय १७- व्ही ५ च्या अपघाताबाबत ट्राय सर्व्हिसेस कोर्ट ऑफ इन्क्वायरीने आपले प्राथमिक निष्कर्ष सादर केले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. यांत्रिक बिघाड किंवा निष्काळजीपणा ही अपघाताची कारणे नाकारण्यात आली आहेत.

त्यात म्हटले आहे की, खोऱ्यातील हवामानात अनपेक्षित बदल झाल्यामुळे तिथे अचानक ढग आल्यामुळे ही दुर्घटना घडली. यामुळे वैमानिकाची अवकाशीय दिशाभूल झाली, ज्यामुळे नियंत्रणात असलेले हेलिकॉप्टर अनियंत्रित झाले आणि त्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला.

भारतीय हवाई दलाने सांगितले की, अपघाताचे संभाव्य कारण शोधण्यासाठी तपास पथकाने ‘फ्लाइट डेटा रेकॉर्डर’ आणि ‘कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर’चे विश्लेषण केले आणि सर्व उपलब्ध प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली. आयएएफने सांगितले की, त्यांच्या निष्कर्षांवर आधारित, कोर्ट ऑफ इन्क्वायरीने काही शिफारसी केल्या आहेत ज्यांचा तपास केला जात आहे.

या अपघातात जनरल बिपिन रावत आणि अन्य १३ जण ठार झाले, त्यात त्यांची पत्नी मधुलिका, त्यांचे संरक्षण सल्लागार ब्रिगेडियर एल. लिडर, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ऑफिसर लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग आणि पायलट ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे शहीद झाले आहेत.

या अपघाताची न्यायालयीन चौकशी एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झाली. एअर मार्शल सिंग हे सध्या भारतीय हवाई दलाच्या बेंगळुरू-मुख्यालयातील प्रशिक्षण कमांडचे प्रमुख आहेत. ट्रेनिंग कमांडची सूत्रे हाती घेण्यापूर्वी, एअर मार्शल हवाई मुख्यालयात महासंचालक होते आणि त्यांनी पदावर असताना उड्डाण सुरक्षेसाठी विविध प्रोटोकॉल विकसित केले.

महत्वाच्या बातम्या-
राजकीय भूमिका नाही तर ‘या’ कारणामुळे किरण माने मालिकेतून बाहेर; निर्मात्यांनी सांगितलं खरं कारण
डोक्यात सळई घुसलेल्या मुलाच्या मदतीला धावून आले वसंत मोरे; एका दिवसात जमवून दिले १४ लाख
‘या’ पाच मोठ्या चुका ठरल्या भारतासाठी पराभवाची घंटा; जाणून घ्या का झाला भारताचा पराभव