…म्हणून अलका कुबलने आपल्या दोन्ही मुलींना चित्रपटसृष्टीपासून लांब ठेवलेय

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील आदर्श सुन म्हणून अलका कुबलकडे पाहिले जाते. त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ९० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठीमध्ये त्यांच्याकडे आदर्श सुन आणि मुलगी म्हणून पाहिले जाते.

सतत कॅमेरासमोर असणाऱ्या अलका कुबल एका सिनेमॅटोग्राफरच्या प्रेमात पडल्या. त्यांचे नाव होते समीर आठल्य. समीर आणि अलका कुबलची भेट चित्रपटाच्या शुटिंग वेळी झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेम झाले आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अलका कुबल यांना लग्नानंतर दोन मुली झाल्या. इशानी आणि कस्तुरी. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकारांच्या मुलांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे. पण अलका कुबल यांच्या मुलींनी मात्र अभिनय क्षेत्रात न येता. दुसऱ्या क्षेत्रांमध्ये करिअर केले आहे.

अलका कुबलच्या दोन्ही मुली इशानी आणि कस्तुरी दिसायला खुपच सुंदर आहेत. त्या फिल्म इंडस्ट्रीतील मोठ्या मोठ्या अभिनेत्रींना सुंदरतेत टक्कर देतात. असे असतानाही या दोघींनीही अभिनय क्षेत्रापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला.

अलका कुबल यांची मोठी मुलगी इशानी वैमानिक ( पायलट ) आहे. वयाच्या २३ व्या वर्षी इशानी पायलट झाली. आईसारखे अभिनय कौशल्य इशानीमध्ये देखील आहे. पण तरीही तिने अभिनय क्षेत्रापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला.अलका कुबलने त्यांना अभिनयापासून लांब ठेवले आणि जी गोष्ट आवडते ती गोष्ट करण्यास सांगितले.

अलका कुबलची छोटी मुलगी कस्तुरी ही देखील खुप शिकलेली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला मोठी मुलगी इशानीचा साखरपुडा झाला आहे. इशानीचा नवरा हा देखील पायलट आहे. लवकरच या दोघांचे लग्न होणार आहे.

इशानीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव निशांत वालीया आहे. हे दोघेही फ्लोरेडीयामध्ये राहतात. इशानी आणि निशांत या दोघांचे लव्ह मॅरेज झाले आहे. अलका कुबल आणि समीर या दोघांचे लव्ह मॅरेज झाले होते.

चित्रपटांच्या सेटवर या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अलकाच्या घरच्यांचा या लग्नाला नकार दिला होता. पण नंतर ते लग्नासाठी तयार झाले. आज अलका कुबल त्यांचे पती आणि मुलींसोबत सुखी संसार करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

हजारो कोटी कमावलेल्या बाॅलीवूड सुपरस्टारने संपत्तीतला रूपयाही बायकोला दिला नाही; कारण..

संपादकाला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे शाहरुखला खावी लागली होती जेलची हवा

त्याचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत; गोविंदाने केली करण जोहरची पोलखोल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.