तुमच्या गाडीचा अपघात झाल्यास खरंच भरपाई द्यायची असते का? जाणून घ्या नियम

मुंबई । देशात वाहतुकीची मोठी समस्या आहे, अनेकजण वाहतुकीचे नियम देखील पाळत नाहीत. यामुळे रोडवर अनेक अपघात होतात. यामध्ये अनेकांचे जीव देखील जातात. रोज अनेकजण जखमी देखील होतात. आणि यामध्ये गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील होते.

आपल्या गाडीने दुसऱ्या गाडीला धडक दिल्याने त्या गाडीचे नुकसान होऊ शकते किंवा त्यात एखादी व्यक्ती जखमी होऊ शकते. अशी परिस्थिती कोणावरही येऊ शकते. अशावेळी समोरचा गाडी चालक पैशांची मागणी करतो.

या गोष्टी आपण रोज बघत असतो. यामध्ये एखाद्या व्यक्तीकडून जास्त पैसे घेतले जातात.मात्र यामध्ये समोरच्या गाडी चालकाला पैसे देण्याची गरज नाही. तुमच्या गाडीचा अपघात झाला असेल तर सर्वात आधी पोलिसांना कळवा आणि आपल्या गाडीच्या कागदपत्रांची फोटो कॉपी त्यांना द्या. पोलिसांना सहकार्य करा.

तुम्ही घटनास्थळी कोणत्याही प्रकारच्या करारावर सही करु नका. आपल्या गाडीचा विमा असेल तर त्याची सर्व जबाबदारी विमा कंपनीची आहे. दुसरी गाडी देखील विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा करु शकतो. यामुळे पैसे देण्याची गरज लागणार नाही.

आपण पैसे दिले तर समोरचा विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा करतो. अशापद्धतीने तो दोन्हीकडून पैसे मिळवतो. यामुळे पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे. यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, गाडीची कागदपत्रे आवश्यक आहेत. ती नसतील तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.

जर प्रकरण कोर्टात गेले, आणि तुम्हाला कोर्टाकडून समन्स मिळाले असेल तर तुम्ही कोर्टात हजर राहा आणि अपघाताबाबत योग्य माहिती द्या. अपघात कसा झाला याचा नकाशा तयार करुन तुम्ही कोर्टाला देऊ शकता. तुम्ही अचूक माहिती दिली तर खटल्याचा निकाल लवकर लागेल.

यामध्ये कलम 2-1(आय) अधिनियमात जर आपल्या गाडीच्या धडकेत कोणी जखमी झाला असेल किंवा त्याचा मृत्यू झाला असेल तर काही रक्कम दिली जाते. मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 2-1 नुसार नुकसानीसाठी थर्ड पार्टीला 7.5 लाख रुपयांपर्यंत कव्हर करावे लागते. महिती नसल्यास मोठे नुकसान होऊ शकते.

ताज्या बातम्या

दिशा वाकानी म्हणजेच दयाभाभीचं हे रूप पाहून व्हाल हैराण; बॅकलेस चोळीमध्ये केलाय धमाकेदार डान्स

इंडियन आयडल १२: ‘डार्लिंग’ गाणे गायल्यानंतर पुन्हा उठली षण्मुख प्रियाला शोमधून बाहेर काढण्याची मागणी

पुण्यात साधी नोकरी करणारा युवक कसा झाला ‘देवमाणूस’; नकारात्मक पात्र असूनही करतोय प्रेक्षकांच्या मनावर राज्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.