ऑस्ट्रेलियाचा पराभव करणारा रिअल लाईफमधील कबीर खान कोण आहे? कशी घेतली मेहनत, वाचा…

टोकियो ऑलम्पिकमध्ये महिला हॉकी खेळाडूंंनी इतिहास रचला. भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा १-० ने पराभव केला. भारतीय टीमने पहिल्यांदाच सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे टीम इंडियाचे कौतुक होत आहे. याआधी देखील चक दे इंडिया या सिमेमात असेच दाखवले गेले आहे.

असे असताना मात्र आता अशीच कथा प्रत्यक्ष मैदानात घडली आहे. यामुळे या सामन्याची मोठी चर्चा झाली. या विजयात टीमचे कोच शोर्ड मरीने यांचा मोठा वाटा आहे. मरीने हे या स्पर्धेत रिअल लाईफमधील कबीर खान ठरले आहेत. यामुळे चर्चा सुरू झाली.

ऑस्ट्रेलिया आणि युरोपीयन टीमच्या फिटनेसपुढे भारतीय खेळाडूंचा निभाव लागत नाही. त्याचा फटका मॅचमध्ये बसतो. हे लक्षात घेऊन त्यांनी खेळाडूंच्या फिटनेसवर भर दिला. त्याचा परिणाम या ऑलम्पिकमध्ये दिसतो आहे. यामुळे मोठे यश प्राप्त झाले आहे.

हॉकी टीममधील खेळाडू गुरजीत कौरने सांगितले की, मरीन यांनी आमच्यातील नेतृत्त्वगूण विकसीत केले. कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तर त्यावर खेळाडूंनीच मार्ग शोधला पाहिजे, असा कानमंत्र मरीन यांनी दिला. मरीन यांच्या या शिकवणीचा फायदा गुरजीतला झाला. गुरजीतने केलेल्या एकमेव गोलच्या जोरावरच भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.

यावेळी अनेक खेळाडू दुखापतग्रस्त असूनही टीममधील जागा जाईल या भीतीने सराव करत. मरीने यांनी या खेळाडूंना विश्वास दिला. त्यांनी दुखापतग्रस्त खेळाडूंना पुरेसा आराम मिळेल तसेच त्यांच्यावर योग्य उपचार होतील यावर भर दिला. यामुळे हे खेळाडू लवकर बरे झाले.

त्यांनी खेळाडूंंमधील नेतृत्वगूण विकसीत केले. यामुळे खेळाडूंनी मोठी मेहनत घेऊन उत्तम खेळ दाखवला. आणि सामन्यात विजय मिळवला. यामुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे.

ताज्या बातम्या

भारीच ना! वाढदिवसाच्या दिवशी सुपरस्टार धनुषने दिल चाहत्यांना खास गिफ्ट; आगामी ‘मारन’चा फस्ट लूक आला समोर

‘माझ्या मुलांसाठी आमच्या खाजगी आयुष्याचा आदर करा’; ट्रोलिंगला वैतागलेल्या शिल्पाने सोशल मिडीयावर जारी केले स्टेटमेंट

निर्माता करण जोहरने सांगितली आयुष्यातील सर्वात मोठी भीती; या गोष्टीमुळे निर्माण होतात अनेक समस्या..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.