..असे वाचा चॅट न उघडता व्हॉट्सअ‍ॅपचे मेसेज, ‘या’ आहेत भन्नाट ट्रिक्स

मुंबई | जगभरातील कोट्यावधी लोक सोशल मीडियाचा वापर करतात. यामध्ये गप्पा म्हणजेच सर्वश्रुत चॅटिंगसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. पण मेसेज चॅट न उघडता वाचण्याचा मोह खूप लोकांना असतो. तर त्यासाठी खालील ट्रिक्स आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज येतो, तो मेसेज पाठवला गेला पोहचला आणि वाचला या गोष्टी समोरच्या व्यक्तीला समजतात. पण खुपदा आपल्याला मेसेज वाचायचा मोह असतो. परंतु ही बाब समोरच्या त्या व्यक्ती आपल्याला लपवायची असते. त्यासाठी काही पर्याय आहेत का याची शोधाशोध करण्याची गरज आता नाही.

यासाठी पहिली सोपी ट्रिक म्हणजे जेव्हा आपल्याला मेसेज येतो तेव्हा मोबाईल स्क्रिनवर नोटिफिकेशन येते. या नोटिफिकेशन सविस्तर स्क्रोल केल्यास किंवा खाली ओढून पाहिल्यानंतर चॅट न उघडता मेसेज वाचता येतात. ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहित असेल. काही लोक या नोटिफिकेश बंद करून ठेवतात. परंतू यामाध्यमातून मसेज वाचता येतात.

व्यक्तीच्या वॉलवर न जाता किंवा चॅट न उघडता मेसेज वाचण्यासाठी दुसरी ट्रिक आहे. त्यासाठी डेस्कटॉप म्हणजे कॅम्प्युटर किंवा लॅपटॉपवर व्हॉट्सअ‍ॅप चालू करा. त्याठिकाणी तुम्हाला आणखी जास्त मेसेज वाचायला मिळेल. आणि समोरच्या व्यक्तील कळणार नाही की तुम्ही मेसेज वाचला आहे.

महत्वाच्या बातम्या-
एकाच मोबाईल क्रमांकावरुन तयार होणार कुंटुंबाचे एटीएमसारखे आधार कार्ड; जाणून घ्या
जाणून घ्या ५० व्या वर्षी २५ वर्षांची दिसणाऱ्या मलायकाचे फिटनेस रहस्य; रोज करते ‘ह्या’ गोष्टी
लखपती बनण्याची सुवर्णसंधी! पोस्टाच्या ‘या’ योजनांमध्ये गुंतवणुक करून मिळवा भरघोस परतावा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.