पालकांनो मुलांना शाळेत पाठवायच्या आधी एम्सचा ‘हा’ कोरोना संदर्भातील रिपोर्ट वाचा

दिल्ली | जगातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातही ही संख्या वाढत आहे पण तिचे वाढण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. यामुळे आता काही राज्यांनी हळूहळू शाळा, महाविद्यालय सुरू करण्यास सुरुवात केली आहे.

काही राज्यांनी तर शाळा सुरू पण केल्या आहेत. तर आता महाराष्ट्र सरकारने शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याआधी दिल्लीच्या एम्स रुग्णालयाने कोरोना संदर्भातील एक रिपोर्ट सादर केला आहे.

एम्सने रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, सर्व पॉझिटिव्ह कोरोना झालेल्या रुग्णांपैकी ४० टक्के रुग्णांना लक्षणे दिसत नाहीत. यातील ७३.५ टक्के रुग्ण हे १२ वर्षांखालील आहेत. अशा मुलांमध्ये कोरोना संसर्ग झालेला असतो पण लक्षण दिसत नाहीत.

त्यामुळे ही मुलं कोरोना पॉझिटिव्ह आहेत की नाही हे शोधणं फार कठीण आहेत. दुसरीकडे देशातील १० राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. यात उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश यासारख्या जास्त लोकसंख्या असणाऱ्या राज्यांचा समावेश आहे.

एम्सचा दावा आहे की, कोरोनाबाधित ४ पैकी ३ मुलांना कसलीही लक्षणे आढळत नाहीत त्यामुळे इतर मुलांना धोका होऊ शकतो. ही मुलं सहज दुसऱ्या मुलांना किंवा व्यक्तींना संक्रमित करतात.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षा मे महिन्यातच होतील अशी माहिती दिली आहे. शाळा सुरू करण्याआधी पालकांची परवानगी घेतली जाणार आहे.

दरम्यान, आंध्रप्रदेशमध्ये ९ वी आणि दहावीचे वर्ग २ नोव्हेंबरपासून चालू करण्यात आले. पण नंतर तीन दिवसातच ५७५ विद्यार्थी आणि ८२९ शिक्षक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आतापर्यंत ७० हजार ७९० शिक्षक आणि ९५ हजार विद्यार्थी यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.