Share

इतक्या भीषण अपघातातून कसंकाय वाचली अभिनेता दीप सिद्धूची गर्लफ्रेंड? वाचा थरारक अनुभव

Deep-sidhu-

मंगळवारी रात्री अभिनेता दीप सिद्धूचा(Deep  दिल्ली सीमेजवळ अपघातात मृत्यू झाला. हा अपघात खारखोडा येथील कुंडली-मानेसर-पलवल द्रुतगती मार्गाजवळ घडला. अभिनेता दीप सिद्धू दिल्लीहून पंजाबला परतत होते. त्यावेळी ही घटना घडली. यावेळी अभिनेता दीप सिद्धूसोबत त्यांची गर्लफ्रेंड रीना राय देखील गाडीमध्ये उपस्थित होती.(read actor deep sidhu accident news)

या दुर्घटनेत अभिनेता दीप सिद्धू यांची गर्लफ्रेंड रीना राय यांना किरकोळ दुखापत झाली आहे. पण या अपघातात अभिनेता दीप सिद्धू यांचा मृत्यू झाला. त्यामुळे अनेकजणांनी या अपघाताला षडयंत्र असल्याचे म्हंटले आहे. २०२१ मध्ये प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाला किल्ल्यावर हिंसाचार झाला होता.

हिंसाचार प्रकरणात अभिनेता दीप सिद्धू यांना अटक देखील करण्यात आली होती. या प्रकरणात अभिनेता दीप सिद्धू यांचे अनेक राजकीय पक्षांसोबत मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा अपघात नसून अभिनेता दीप सिद्धू यांच्याविरोधात रचलेला कट आहे, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

अभिनेता दीप सिद्धू यांच्या अपघाताची फॉरेन्सिक चौकशी केली जाणार आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. हा अपघात कसा झाला हे जाणून घेण्यासाठी फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून काही नमुने गोळा केले आहेत. त्यामुळे अभिनेता दीप सिद्धू यांचा अपघात नेमका कसा झाला? याचा लवकरच उलगडा होणार आहे.

पोलीस सध्या या घटनेचा कसून तपास करत आहेत. या अपघातानंतर अभिनेता दीप सिद्धूची गर्लफ्रेंड रीना राय म्हणाली, “जेव्हा अपघात झाला तेव्हा मी झोपली होते, कार आणि ट्रकची धडक झाली तेव्हा जोरदार आवाज झाला. तेव्हा दीप रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचं मी पाहिलं”, अशी माहिती रीना राय यांनी दिली.

सोनीपतचे एसपी राहुल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप सिद्धूचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला आहे. याशिवाय ट्रक मालक आणि अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे पोलिसांना कारमध्ये दारूची बाटली सापडली आहे. पण यासंदर्भात माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘संजय राऊत दरवर्षी माझ्या घरी येतात’, ‘तो’ फोटो शेअर करत मोहित कंबोज यांनी राऊतांना पाडले तोंडघशी
विराटबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर भडकला रोहित शर्मा, म्हणाला, ”तुम्ही मिडीयावाले गप्प बसलात तर बरं होईल”
आंबेगावची होतेय बुधवार पेठ, पोलिसांना हफ्ता देऊन महिला करताय देहविक्री?

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now