तेलुगू सुपरस्टार महेश बाबू सध्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. “मला बॉलीवूडमधून खूप ऑफर्स आल्या आहेत. पण बॉलीवूडला मी परवडत नाही. त्यामुळे मी माझा वेळ वाया घालवू शकत नाही”, असं वक्तव्य तेलुगू सुपरस्टार महेश बाबू(Mahesh Babu) यांनी केलं होतं. या वक्तव्यामुळे सध्या चित्रपट क्षेत्रात खळबळ उडाली आहे.(read about mahesh babu income)
तेलुगू सुपरस्टार महेश बाबूची निर्मिती असलेला ‘मेजर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. यावेळी महेश बाबूला बॉलीवूड संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अनेक बॉलीवूड चित्रपटांना नकार दिल्याचे तेलुगू सुपरस्टार महेश बाबूने सांगितले. आज आपण महेश बाबूच्या कारकीर्द आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती घेणार आहोत.
अभिनेता महेश बाबूची दक्षिणेतील राज्यांमध्ये फार क्रेझ आहे. ४६ वर्षीय अभिनेता महेश बाबूने लहानपणीच अभिनेता बनण्याचे ठरवले होते. महेश बाबूने आपल्या अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात ‘नीदा’ या तेलगू चित्रपटातून केली. या चित्रपटात अभिनेता महेश बाबूने बालकलाकार म्हणून काम केले होते.
अभिनेता महेश बाबूने बालकलाकार म्हणून एकामागून एक ८ चित्रपट केले होते. अभिनेता महेश बाबूने व्यापरी’, ‘सीथाम्मा वकितलो सरिमल्ले चेट्टू’ ‘मुरारी’, ‘पोकिरी’, ‘नेनेकोडाइन’, ‘सरीमंथुडू’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता महेश बाबूच्या ‘अथडू’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.
अभिनेता महेश बाबूला फिल्म फेअरसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हैदराबादमध्ये अभिनेता महेश बाबूचा आलिशान बंगला आहे. या बंगल्यामध्ये जिम, स्विमिंग पूल, मिनी थिएटर यासह सर्व सुविधा आहेत. महेश बाबूचे हैदराबादच्या जुबली हिल्स परिसरात दोन मोठे बंगले आहेत. या बंगल्यांची किंमत सुमारे ३० कोटी रुपये आहे.
याशिवाय कर्नाटकातील बंगळुरूमध्ये अभिनेता महेश बाबूची कोट्यवधी रुपयांच्या अनेक मालमत्ता आहे. एका अहवालानुसार, महेश बाबूची एकूण संपत्ती सुमारे १३५ कोटी रुपये आहे. अभिनेता महेश बाबू एका चित्रपटासाठी तब्बल ५५ कोटी रुपये चार्ज करतो. तसेच चित्रपटाच्या नफ्यात देखील अभिनेता महेश बाबूचा वाटा असतो.
महत्वाच्या बातम्या :-
तुळजाभवानी मंदिरात झाला अपमान, संभाजीराजेंनी अधिकाऱ्यांना फोन करून झापलं, म्हणाले..
“तुमच्यात हिम्मत असेल तर ताजमहलला मंदिर बनवून दाखवा”, मेहबुबा मुफ्तींचे भाजपाला थेट आव्हान
किळसवाणे! भोंदू बाबा शिष्यांना देत होता विष्ठा आणि मूत्र खाण्याचा सल्ला, कारण वाचून चक्रावून जाल