देवेंद्र फडणवीस ‘शेतकऱ्यांचे हृदयसम्राट’ म्हणणाऱ्या गोपीचंद पडळकरांना लोकांनी धु धु धुतले

पुणे | भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर त्यांच्या आक्रमक शैलीमुळे नेहमी चर्चेत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विरोधात भाजपने पडळकरांना बारामतीमधून विधानसभा निवडणूकीत उभं केलं होतं. मात्र अजित पवार यांनी पडळकरांना पराभवाची धूळ चारली होती.

पुण्यात राज्य सरकारच्या विरोधात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यामध्ये गोपीचंद पडळकर सहभागी झाले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा देत महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले होते.

काल (दि.14) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते. त्यांचे पुणे विमानतळावर गोपीचंद पडळकरांनी स्वागत केले होते. पडळकरांनी फडणवीस यांना फुलांचा गुच्छ देत असतानाचा फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. गोरगरीब, उपेक्षित, वंचित, युवक, कष्टकरी, शेतकऱ्यांचे हृदयसम्राट देवेंद्र फडणवीस साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अशी पोस्ट शेअर केली होती.

 

फडणवीसांना ‘शेतकऱ्यांचे हृदयसम्राट’ म्हणल्याने गोपीचंद पडळकरांच्या या पोस्टवर सोशल मिडिया युजर्सनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.  पडळकरांना अनेकांनी सवाल केले आहेत. सोशल मिडियावर सध्या मिम्स व्हायरल होत आहेत.

 

 

महत्वाच्या बातम्या-
ठाकरे मंत्रीमंडळात मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता; पहा कुणा कुणाचे मंत्रीपद धोक्यात
भाजपला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी कोणासोबतही युती करण्याची तयारी- इम्तियाज जलील
इशान किशनची गर्लफ्रेंड आहे मॉडेल, हॉट फोटोंचा सोशल मिडीयावर धुराळा
रिक्षाचालकाच्या लावणीने सेलिब्रिटींना घातली भुरळ, आता मिळतेय चित्रपटात काम करण्याची संधी

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.