नेहा कक्करकडून पाच लाख स्वीकारणारे संतोष आनंद म्हणतात, ‘भीक नाही भाकरी हवी आहे’

मुंबई | ‘एक प्यार का नगमा है, मोजो की रवानी है’ हे गाणं सर्वांच्याच आठवणीत असेल. या गाण्याचे गीतकार संतोष आनंद हे चर्चेत आले आहेत. ते भीक मागून आपला उदरर्निवाह करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. माध्यमांनीही अशाच आशयाच्या बातम्या दिल्या होत्या. हे पाहून संतोष आनंद प्रचंड दुखावले गेले आहेत.

संतोष आनंद हे एक असं नाव आहे ज्यांच्या गीतांनी सत्तरच्या दशकात अनेकांना भुरळ पाडली. त्यांनी लिहिलेली अनेक गाणी आजही लोकांना आवडतात. लोक त्यांची गाणी गुणगुणताना आजही दिसतात. गेल्या काही दिवसांपूर्वी संतोष आनंद हे इंडियन आयडॉलच्या सेटवर आले होते. यादरम्यान त्यांना परिक्षक नेहा कक्करने पाच लाखांची मदत केली. तर विशाल ददलानी याने त्यांच्या गीतांना संगीत देण्याचे मान्य केले.

यानंतर संतोष आनंद यांच्या आर्थिक परिस्थिबाबत चर्चा सुरु झाली. यावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी तर हद्दच केली ते भीक मागून जगत असल्याच्या बातम्या केल्या. हे वाचून संतोष आनंद दु:खी झाले. दुखावलेल्या संतोष आनंद यांनी चाहत्यांना भावनिक आवाहन केले आहे.

संतोष आनंद म्हणाले, माणसाला केवळ दोन वेळच्या भाकरीची गरज असते. मी आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी आहे. त्यामुळे मी कुणाकडे मदत मागितली नाही. माणसाच्या आयुष्यात प्रेम महत्वाचे आहे. पैसाच सर्वकाही नसतो. मी आयुष्यात माणसांचे प्रेम कमावले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
नेहा कक्करने ऑन कॅमेरा केलेल्या पाच लाखांच्या मदतीवर संतोष आनंद यांचे स्पष्टीकरण, म्हणाले…
गृहिणींचं बजेट कोलमडणार! गॅस सिलिंडरच्या किमतीत एका महिन्यात तिसऱ्यांदा वाढ
कंगना पुन्हा बरळली! म्हणतीये, ‘श्रीदेवीनंतर फक्त मीच…
दुचाकी, चारचाकी किंवा जमीन आहे अशा कुटुंबाचे रेशनकार्ड रद्द होणार? वाचा काय आहे नियम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.