Santosh Bangar : नुकताच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी एका अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला आहे. बांधकाम कामगारांना निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात येत असल्याचा प्रकार त्यांनी उघडकीस आणला आहे. मात्र, यावेळी ते जास्तच आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.
हिंगोली जिल्ह्यामध्ये बांधकामावरील कामगारांना मोफत दुपारच्या भोजनाची सुविधा कामगार विभागामार्फत करण्यात आली आहे. या जिल्ह्यातील एका उपहारगृहाला संतोष बांगर यांनी भेट दिली. याठिकाणी कामगारांना निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यामध्ये खराब झालेला भात, बुरशी आलेल्या पोळ्या, वरण पाहून आमदार संतोष बांगर संतापले. याबाबत त्यांनी तिथल्या व्यवस्थापकाला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतोष बांगर यांनी सरळ त्याच्या कानशिलात लगावली.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून विरोधकांकडून संतोष बांगर यांच्यावर टीका होत आहेत. अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण संबंधित कंत्राटदाराकडून कामगारांना दिले जात होते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आमदार बांगर यांनी केली आहे.
दरम्यान, त्यांच्या या कृतीवर विरोधकांकडून प्रचंड टीका होत आहेत. यावर संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, “संबंधित अधिकाऱ्याला मी समज दिली. लोकांना दिलं जाणारं जेवण निकृष्ट दर्जाचं आहे. तिथल्या व्यक्तीने यावर उडवाउडवीची उत्तरं दिली त्यामुळे मला पर्याय नव्हता. मी जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं आहे. कंत्राट रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.”
तसेच, “गोरगरीबांसाठी मला कायदा हातात घ्यायची वेळ आली तर मी कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही,” असेही संतोष बांगर माध्यमांशी बोलताना म्हणाले. पुढे बोलताना, अशा किती टीका माझ्यावर झाल्या तरी त्याची पर्वा नाही, असेदेखील ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
‘त्या सीसीटीव्हीत बरेच काही सापडेल’; मेटे यांच्या ड्रायव्हरने केला मोठा खुलासा
जोपर्यंत तुम्हाला एकट्याने वेळ घालवायची वेळ येणार नाही, तोपर्यंत… असं म्हणत रतन टाटांनी म्हातारपणाच्या दुःखाला वाट करून दिली
मोदी सरकारचा आदित्य ठाकरेंना मोठा दणका! ५०० कोटींच्या भूखंड वाटपाची होणार चौकशी
आम्ही सरकार चालवत नाही, पुढचे ७/८ महीने कसेतरी सांभाळायचेत; भाजप मंत्र्याची ऑडीओ क्लिप व्हायरल