मुंबई इंडियन्सने संघात सामील केल्यानंतर अर्जुन तेंडुलकरनं दिली प्रतिक्रिया, म्हणाला मी…

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जून तेंडूलकरला कोणता संघ आयपीएलच्या हंगामात सामील करून घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्जूनने यावर्षी पहिल्यांदाच लिलावासाठी नाव नोंदणी केली होती. अखेर अर्जूनचं नशीब चमकलं आणि त्याला मुंबई इंडियन्स संघाने वीस लाखांची बोली लावत संघात सामील करून घेतले आहे.

पहिल्यांदाच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरणार असल्याने अर्जूनही आनंदात दिसत असल्याचा पाहायला मिळत आहे. त्याचा व्हिडिओ मुंबई इंडियन्स संघाने सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी कमेंट्स करत अर्जूनला शुभेच्छा दिल्या आहेत.

अर्जुन तेंडूलकरने म्हटले आहे की, ‘मी लहानपणापासून मुंबई इंडियन्सचा मोठा चाहता आहे. मुंबई पलटनमध्ये मी सहभागी होण्यास खुपच उत्सूक आहे आणि ब्लू गोल्ड जर्सी घालण्याची आतुरतेने वाट बघतोय. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी संघमालक, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ यांचे आभार मानतो, असं अर्जूनने म्हटले आहे.

 

दरम्यान, अर्जून तॆंडूलकरने 14 फेब्रूवारीला झालेल्या पोलिस निमंत्रण शिल्ड स्पर्धेत तुफान खेळी केली होती. त्याने 31 चेंडूत 77 धावा काढत उपस्थितांचे मन जिंकले होते. त्याच्या या कामगिरीचा फायदा त्याला आयपीएल लिलावात झाला आणि त्याला मुंबई इंडियन्सने संघात दाखल करून घेतले.

ख्रिस मॉरिस ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ख्रिस मॉरिसला यंदाच्या आयपीएल हंगामात १६ कोटी २५  लाख रूपयांना राजस्थान रॉयल्स संघाने विकत घेतले आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याच खेळाडूला इतकी बोली लागली नव्हती. त्याला राजस्थान रॉयल्स संघाने सामिल करत सर्वात महागडा बोली लागलेला खेळाडू ठरवला आहे.
महत्वाच्या बातम्या-
पहिल्याच ऑक्शनमध्ये ५ कोटी २५ लाखांना विकला गेलेला शाहरूख खान कोण आहे माहिती का?
बाबो! ख्रिस मॉरिस ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, किंमत वाचून धक्का बसेल
सेटींग लागली! अखेर अर्जून तेंडूलकरला मुंबई इंडीयन्सने विकत घेतलंच

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.