“सेना भवनापर्यंत स्वतःच्या पायावर याल, पण जाताना खांद्यावरच जावं लागेल, खांदेकरी घेऊन या”

मुंबई । भाजप आमदार यांनी एक वक्तव्य केले आणि यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले. त्यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली होती. यामुळे आता शिवसैनिक संतप्त झाले आहेत. आता आज सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरपार लढाईची भाषा केली आहे. यामुळे आता वातावरण तापले आहे.

यामध्ये शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जाण्याची वेळ येईल, असे राऊत यांनी म्हटले आहे. अनेक शिवसेना आमदारांनी देखील यामुळे भाजपवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भाजपवर निशाणा साधला आहे.

तसेच शिवसेना भवनाशी पंगा घेणारा अजून जन्माला येयचाय. कालपर्यंत कुणा दुसऱ्यांच्या बॅगा उचलून गुजराण करीत होते. आज पोटापाण्यासाठी आणखी कुणाचे तरी जोडे उचलत आहेत. असे बाटगे हेच महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी काळ ठरत आले.

पुढे काळाच्या ओघात हे बाटगे वरळीच्या गटारातून वाहून कायमचे नामशेष झाले. त्यांचे नामोनिशाणही उरले नाही. शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाच. असा माणूस अद्याप जन्माला यायचा आहे. असेही म्हटले गेले आहे. सामनामधून आज भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.

मराठी माणूस या राजकीय बेवड्यांचा चोख बंदोबस्त केल्याशिवाय राहाणार नाही. तरीही अंगावर यायचे असेल तर या, अर्थात तेवढी मर्दानगी अंगात असेल तर, पण एक लक्षात ठेवा, शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जाण्याची वेळ येईल. त्यासाठी येताना खांदेकरीही घेऊन या.

महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्यांना खांद्यावरच जावे लागते, हा इतिहासच आहे. शिवसेना भवनाच्या आसपास मैलभर परिघात उभे राहण्याची यांची कुवत नाही. तेजस्वी सूर्यावर थुंकून लक्ष वेधून घेण्यापलीकडे यांचे कर्तृत्व नाही.

पत्नीच्या मृत्यूनंतर हा बाप बाळाला कडेवर घेऊन शिकवतोय, जाणून घ्या ह्दयस्पर्शी कहाणी…

पांड्या बंधूंनी मुंबईत घेतले ३० कोटींचे घर; एकेकाळी मॅगी खाऊन दिवस काढत होते

प्रसिद्ध प्रवचनकार जया किशोरी यांचा लग्नाबद्दल मोठा खुलासा, म्हणाल्या लग्न करणार, पण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.