दोघा भावांना ॲसिडने अंघोळ घालणाऱ्या शहाबुद्दीनच्या क्रुरतेचे किस्से सिनेमातील व्हिलनलाही लाजवतील; वाचा..

लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी खासदार आणि बिहारचा बाहुबली म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद शहाबुद्दीन यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर दोन खुनांचे आरोप होते आणि त्याचीच शिक्षा ते तुरूंगात भोगत होते.

शहाबुद्दीन यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाच्या संसर्गानंतर तिहार तुरूंगातून आधी दीन दयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.

एक काळ असा होता की आरजेडीचे बाहुबली शहाबुद्दीन यांना माणसाच्या जीवाची काहीच परवा नव्हती. असे म्हणतात की शहाबुद्दीनकडे तिरक्या नजरेने पाहणे देखील मृत्यूला आवाहन समजले जात होते. त्यावेळी बिहारमध्ये आरजेडी सरकार होते आणि शहाबुद्दीन आरजेडीचे बाहुबली नेते होते.

या सर्व गोष्टी पाहून पोलिस शहाबुद्दीनला आडवे जात नव्हते. २००४ मध्ये चंदा बाबू यांची तीन मुले गिरीश, सतीश आणि राजीव यांना शहाबुद्दीनच्या दरोडेखोरांनी पळवून नेले होते. उपद्रव्यांनी गिरीश आणि सतीश यांना अ‍ॅसिडने अंघोळ घालून ठार केले होते.

राजीव हा या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी होता. त्याने आपला जीव वाचवला आणि दरोडेखोरांच्या हातातून तो निसटला. नंतर, राजीव हे आपल्या भावांवर झालेल्या हत्येचे साक्षीदार बनला. पण २०१५ मध्ये शहराच्या डीएव्हीच्या वळणावर त्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले.

हत्येच्या अवघ्या १८ दिवस आधी राजीवचे लग्न झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. अ‍ॅसिड हल्ल्यानंतर सीवानचे तत्कालीन डीएम सीके अनिल आणि एसपी एस रत्न संजय कटियार शहाबुद्दीनच्या दहशतीचा अंत करण्याचा निर्धार केला होता.

या दोन्ही अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पोलिसांच्या भरमसाठ टोळीसह शहाबुद्दीनच्या प्रतापपूरच्या घराला वेढा घातला. शहाबुद्दीनचे समर्थकही आधीपासूनच तयार होते. त्यांनी पोलिस दलावर वेगाने गोळीबार सुरू केला.

पोलिस दल देखील पूर्ण तयारीसह गेले होते आणि त्यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. पोलिसांनी असा दावा केला होता की, फायरिंग थांबल्यानंतर जेव्हा पोलिस शहाबुद्दीनच्या घरात पोहोचले तेव्हा त्यांना धक्काच बसला.

शहाबुद्दीनच्या घरात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी शस्त्रे आढळली. घरातून पाकिस्तानी आयुध कंपनीने स्टँप केलेले एके-रायफलही जप्त करण्यात आल्या होत्या. अशी अनेक शस्त्रे आढळली जी फक्त पाकिस्तानी सैन्यच वापरतात.

छापेमारीत मौल्यवान दागिने व रोख रक्कम याशिवाय त्याच्या घरातून सिंह आणि हरिण यासारखे वन्य प्राण्यांचे कातडेही जप्त केले गेले होते. यापूर्वी २००१ मध्येही शहाबुद्दीनला अटक करण्यासाठी आणि त्याच्या प्रतापपूरच्या घरी छापा टाकण्यासाठी बिहार पोलिस पोहोचले होते.

या दरम्यान शहाबुद्दीनच्या कार्यकर्त्यांसह पोलिसांमधील गोळीबार सुमारे २ तास चालला. यावेळी 3 पोलिस ठार झाले. २००१ मध्येच आरजेडीचे स्थानिक अध्यक्ष मनोजकुमार पप्पू यांच्याविरूद्ध वॉरंट घेऊन पोलिस आले असता शहाबुद्दीन यांनी पोलिस अधिकारी संजीव कुमार यांना कानाखाली पेटवली होती.

शहाबुद्दीनच्या साथीदारांनी पोलिसांना जोरदार मारहाण केली. यानंतर पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले. सीवानचे चार वेळचे आरजेडीचे खासदार शहाबुद्दीन यांच्यावर हिंदी दैनिकातील पत्रकार राजदेव रंजन यांच्या हत्येमध्ये हात असल्याचा आरोप आहे.

१३ मे २०१६ रोजी संध्याकाळी बिहारमधील सिवान जिल्ह्यात पत्रकार राजदेव रंजन यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यावेळी राजदेव आपल्या कार्यालयातून बाहेर आले. त्यांच्या पत्नीने शहाबुद्दीन यांचा या घटनेत हात असल्याचा आरोप केला होता.

या सनसनाटी घटनेनंतर सिवानसह संपूर्ण बिहारमध्ये खळबळ उडाली होती. या घटनेनंतर बिहार सरकारने तपास सीबीआयकडे सोपविला होता. त्यानंतर त्यांना तुरूंगात टाकण्यात आले होते. असे म्हणतात की ते लालू प्रसाद यादव यांच्या खुप जवळचे होते. सिवान जिल्ह्यात त्यांचाच बोलबाला होता.

असे म्हणतात की त्यांनी सिवानमध्ये स्वताचे वेगळे सरकार स्थापन केले होते. ते स्वताचे न्यायालय भरवायचे आणि स्वताच त्याच्यावर निकाल द्यायचे. २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी शहाबुद्दीन यांना अटक करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या
सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल; सिरमच्या आदर पुनावालांचा सणसणाटी गौप्यस्फोट
नगरमध्ये महिलेने शेतात सापडलेला बॉम्ब मुलाकडे दिला, अन पुढे जे झालं त्यानं अख्ख नगर हादरल
एक वर्षापासून वेगळे राहणारे धर्मेंद्र व हेमामालिनी वेगळे होणार? स्वत: हेमानेच केला खुलासा
काय सांगता! ऑक्सिजनसाठी पिंपळाच्या झाडाखाली झोपले रुग्ण, प्रकृतीही झाली स्थिर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.