Share

५०० च्या नोटेबाबत मोठी बातमी! RBI करणार मोठा बदल, ताबडतोब बँकेत जा अन् करा ‘हे’ काम

Rs.500

RBI : नोटबंदीनंतर देशभरात चलनाबाबत अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. आज आम्ही तुम्हाला नोटांशी संबंधित एक मोठे अपडेट सांगणार आहोत. भारतीय रिझर्व्ह बँक चलनात मोठे बदल करू शकते. तुम्हीही तुमच्या घरात नोटा साठवून ठेवल्या असतील तर लगेच जाणून घ्या आता कोणते बदल होऊ शकतात.

देशभरात चलनात येणाऱ्या नोटांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा खुलासा केला आहे. देशातील दृष्टिहीन लोकांसाठी रुपया आणि नाणी अधिक अनुकूल बनवण्याचे मार्ग सुचवण्यास न्यायालयाने तज्ञांना सांगितले आहे. अशा सूचनेनंतरच नवीन प्रकारच्या नोटा जारी केल्या जाऊ शकतात.

रिझव्‍‌र्ह बँकेने नोटेमधील स्पर्शाशी संबंधित अनेक बदलही केले आहेत, जेणेकरून दृष्टिहीन लोकांना सहज ओळखता येईल आणि रुपया किंवा नाणी यात फरक करता येईल. तज्ज्ञांच्या सूचनेनंतर रुपया किंवा नाणे बदलून दृष्टिहीनांसाठी योग्य बनविण्याचा प्रयत्न केला जातो.

याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही अलीकडेच MANI अॅप अपडेट केले आहे. आता तुम्हाला यात 11 भाषांचा सपोर्ट मिळेल. पूर्वी त्यात फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषा उपलब्ध होती. आता हे अॅप उर्दू, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये उपलब्ध असेल. तसेच हे अॅप पूर्णपणे मोफत असेल.

रिझर्व्ह बँकेने 2020 मध्ये हे अॅप लाँच केले. अंध लोकांना नोटा ओळखण्यात येणाऱ्या अडचणी दूर करणे हा त्यामागचा उद्देश होता. या अॅपच्या मदतीने कोणतीही व्यक्ती नोट सहज ओळखू शकते. व्यक्तीच्या हातात कोणती नोट आहे, ते अॅपच्या माध्यमातून आवाजात ऐकू येते. अशा परिस्थितीत, अंध व्यक्तींना त्यांच्याकडे कोणती नोट आहे हे अगदी सहज कळू शकते.

महत्वाच्या बातम्या
jayant patil : “शिंदे गटातील आमदार म्हणतात, कुठून अवदसा आठवली या नादाला लागलो”
jitendra awhad : शिंदेगटावर तुटून पडणारे जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू
shivsena : शिवसेनेचं ‘मिशन ५०’ पूर्ण..! शिवसेनेने केला राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’; बोरनारेंना हादरा, वाचा नेमकं काय घडलं?

आर्थिक इतर ताज्या बातम्या तुमची गोष्ट

Join WhatsApp

Join Now