HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; HDFC च्या ‘या’ सेवांवर RBI ने घातले निर्बंध

खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणजे एचडीएफसी बँकेच्या काही सेवांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लावले आहेत. यामध्ये बऱ्याच डिजिटल सेवांचा समावेश आहे. त्यामुळे याचा जबर फटका एचडीएफसीला बसणार आहे.

आरबीआयने २ डिसेंबरला आदेश जारी करून एचडीएफसीच्या नवीन क्रेडिट कार्ड ग्राहक जोडण्यासोबतच इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि पेमेंट युटिलिटी सर्व्हिसवर बंदी घातली आहे. आरबीआयने बंदी घालण्याचे कारणही सांगितले आहे.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार एचडीएफसीच्या इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगझ पेमेंट युटिलिटीजमध्ये सातत्याने अडचणी येत आहेत. नुकतीच अशी एक घटना घडली होती ज्यामध्ये बँकेच्या इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट सिस्टीममध्ये समस्या आली होती.

तसेच प्रायमरी डेटा सेंटरमध्ये पावर फेल झाल्याचं कारण सांगण्यात आले होते. आणि मागील २ वर्षात एचडीएफसीच्या ग्राहकांना डिजिटल पेमेंटसाठी अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.

आरबीआयने या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत आणि जोपर्यंत सर्व गोष्टी सुरळीत होत नाहीत तोपर्यंत निर्बंध हटवले जाणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. दरम्यान हे निर्बंध कधीपर्यंत राहतील याबाबत माहिती मिळाली नाही. पण त्यामुळे एचडीएफसीच्या ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

तारक मेहतात येणार नवीन दयाबेन; जुन्या दयाबेनपेक्षा प्रचंड सुंदर आणि स्टाईलिश आहे ही

मारुती व टाटाला टक्कर द्यायला या कंपनीने आणली स्वस्तातली SUV, किंमत फक्त…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.