सध्या भाजप आणि शिवसेना पक्षात जोरदार शाब्दिक वाद सुरु आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. तुम्ही युद्धाचे नियम पाळणार नसाल, तुम्ही पाठीमागून वार करणार असाल, तर मलाही कोथळा काढण्याचा अधिकार आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी भाजपवर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला होता.(ravsaheb danve statement on shivsena party)
यावर केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आमच्याशी यांचे लग्न ठरले होते, पण हे पळून गेले आणि दुसऱ्याशीच लग्न केले. यांचे सर्व आमदार आणि खासदार नाराज आहेत एका मुख्यमंत्रीपदासाठी. आता हे काय कोथळे काढतात? निवडणुकीत आम्हीच यांचे कोथळे काढू”, असा पलटवार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर केला आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, “आमच्यासोबत यांचं लग्न ठरलं होतं. पण हे पळून गेले आणि दुसऱ्याशीच लग्न केलं. तुम्हीही मतं दिली असतीलच ना? तुम्ही भाजप सेनेला मतदान दिलं. स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी यांनी युती तोडून टाकली. आज यांचे सर्व आमदार खासदार एका मुख्यमंत्रीपदासाठी नाराज आहेत.”
“यांचा निर्णय जनता करेल. आता हे काय कोथळे काढतात? निवडणुकीत आम्हीच यांचे कोथळे काढू”, असे केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. यावेळी ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भातील विषयावर देखील केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलं. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
” छगन भुजबळ यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. त्यामध्ये काही तथ्य नाही. सर्वोच्च न्यायालयाने यांच्याकडे इम्पेरिकल डेटा देण्याची मागणी केली होती. पण दोन वर्षात यांना इम्पेरिकल डेटा देता आला नाही आणि आता सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात निर्णय दिल्यानंतर राज्य सरकारने सात महिन्यांची मुदत मागितली आहे. हे सरकार जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहे”, असा आरोप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पुढे म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी समाजाचे नेते केवळ शोभेच्या वस्तू आहेत. ओबीसी समाजावर अन्याय करणे हे महाविकास आघाडी सरकारचे धोरण झाले आहे”, असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
रस्त्यावरच्या धार्मिक कार्यक्रमांना कायमची बंदी; योगी सरकारचा आणखी एक क्रांतीकारी निर्णय
स्वत:ला खूप हुशार मानत असाल ‘या’ फोटोतील हरीण शोधून दाखवा? ९९% लोकं झालेत फेल
चुकूनही घरच्यांसमोर बघू नका ‘ही’ वेब सिरीज, बोल्डनेस आणि इंटिमेट सीन्सने हद्द केलीये पार