बेकरीतील खारी टोस्टवर पाय दिलेला व्हिडिओ पाहून संतापली रविना टंडन, म्हणाली..

अनेक लोकांना चहा सोबत खारी बटर खाण्याची सवय असते. पण आता सोशल मीडियावर एका महाशयाचा प्रताप ऐकल्यानंतर तुम्हीही खारी टोस्ट खाण्याचे विसरून जाल..सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

हा व्हिडीओ अद्याप कुठला आहे हे समजल नसलं तरी हा व्हिडिओ पाहून सर्वसामान्य लोकांपासून बॉलिवुड अभिनेत्री रविना टंडन हिने देखील संताप व्यक्त केला आहे.

रविनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीला हा खारी टोस्ट कंपनीमध्ये चालू असलेल्या घाणेरडं कृत्य करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. तिने तिच्या अकाउंटला शेअर करून मला आशा आहे की असे कृत्य करताना ते पकडले जातील आणि त्यांना कठोर शिक्षा मिळेल’ अशा प्रकारचे कॅप्शन देऊन तिने संताप व्यक्त केला आहे.

या व्हिडिओमध्ये या कामगारांनी केलेल्या कृत्यामुळे लोकांकडून संताप व्यक्त होत आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे हे कामगार खारी टोस्टचे पॅकिंग करताना त्यावर पाय देऊन घाणेरडं कृत्य करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये काही कामगार खारी आणि टोस्ट तयार झाल्यानंतर पॅकिंग करताना दिसत आहे. यातील एक व्यक्ती खारी टोस्टवर पाय ठेऊन ते टोस्ट दाबताना दिसत आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ एक व्यक्ती काढत आहे. तर व्हिडीओमध्ये पुढे दुसरी व्यक्ती तेच टोस्ट आणि खारी चाटून पॅकिंग करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये या कामगारांनी केलेल्या कृत्यामुळे लोकांकडून संताप व्यक्त होत आहे. लोकांकडून अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई होऊन शिक्षा करावी अशी मागणी होत आहे. व्हिडीओ GieDDe नावाच्या एका इंन्स्टाग्राम अकाऊंटरून शेअर केला आहे. व्हिडिओला आतापर्यंत ३६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या
हृदयस्पर्शी! मायलेकीचा विहीरीत बुडून मृत्यू; मृत्युनंतरही चिमुकलीने आईला मारलेली मिठी तशीच होती
चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपमध्ये येण्याची आॅफर; मुश्रीफांचा सणसणाटी गौप्यस्फोट
मोठी बातमी! घोटाळ्यात किरीट सोमय्या यांनी घेतले थेट शरद पवारांचे नाव, राज्यात खळबळ…
कन्यादान का म्हणता, दान करायला मुली वस्तू आहेत का?आलिया भटचा संतापजनक सवाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.