रविना टंडन झाली आज्जी, तिच्यात आणि मुलीत आहे ११ वर्षाचा फरक; जाणून घ्या पूर्ण किस्सा

‘आज्जी’ – हा शब्द जितका गोंड आहे तितकच हे नात खास आणि अनोख आहे. तसेच आज्जी आणि नातवंडाच्या प्रेमाला कशाचही मोल नाही. जेव्हा हा शब्द येतो तेव्हा ६० ते ७० वयोगटातील महिलांचे चित्र लोकांच्या मनात येते. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगत आहोत जे वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी आज्जी बनली.

आज आम्ही बोलत आहोत वयाच्या ४६ व्या वर्षी नानी बनलेल्या रवीना टंडनबद्दल. रवीना सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. ती दररोज काहीना काही फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत राहते. याशिवाय चाहत्यांनी अपलोड केलेल्या पोस्टवरही तिने आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळतात

अलीकडेच तिने ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहे. त्या फोटोत रवीना खूप गोंडस दिसत होती. त्याचवेळी अश्याच एका खास संभाषणादरम्यान रवीनाने ती आज्जी झाल्याची एक रंजक कहाणी सांगितली आहे.

Raveena Tandon says her decision to adopt at the age of 21 was  controversial: 'They said no one would want to marry me' | Hindustan Times

वास्तविक पाहता  या वयात रवीना टंडनचे ‘आज्जी’ होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या छाया आणि पूजा या दोन दत्तक मुली आहेत. त्यांचे लग्न  झाले आहे आणि त्या दोघीही आता माता झाल्या आहेत.

रवीना टंडन बॉलिवूडच्या आवडत्या कलाकारांपैकी एक आहे. लोक त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवतात. कदाचित आपल्याला हे देखील ठाऊक असेल की जेव्हा रवीना टंडन २१ वर्षांची होती तेव्हा तिने दोन मुली दत्तक घेतल्या. त्यावेळी त्यांची मोठी मुलगी ११ वर्षांची होती. आता छाया आणि पूजा विवाहित आहेत आणि दोघीनाही त्यांची स्वतःची मुले आहेत. यामुळे रवीना आज्जी झाली आहे.

एका मुलाखती दरम्यान रवीना टंडनने सांगितले होते की ती आज्जी झाली आहे. रवीना टंडन म्हणाली, जेव्हा ‘आज्जी’ हा शब्द म्हणतो तेव्हा लोक ७० किंवा ८०वर्षांच्या स्त्रीचा विचार करतात. जेव्हा मी माझ्या मुलींना दत्तक घेतले तेव्हा मोठी मुलगी ११ वर्षांची होती. यामुळे आमच्यात फक्त ११ वर्षांचा फरक होता. आता ती आई झाली आहे. ती मला माझ्या मैत्रिणीसारखी वाटते पण आमचे एक आई-मुलीचे नाते आहे आणि मी त्यांच्या मुलांना आजी बनले आहे.

त्याचवेळी रवीनाने असेही म्हटले आहे की पूजा आणि छाया यांना दत्तक घेणे हा तिचा सर्वोत्तम निर्णय होता. रवीना म्हणते, ‘त्यावेळी लोक खूप विचार करायचे आणि माझ्या निर्णयाबद्दल त्यांचेही असेच मत होते, कोणीही माझ्याशी लग्न करणार नाही. पण नशिबात जे लिहिले आहे तेच आहे. मी यापेक्षा भाग्यवान  असूच शकत नाही. ‘

विशेष म्हणजे रवीना टंडनचे लग्न फिल्म डिस्ट्रीब्यूटर अनिल थडानी यांच्याशी झाले आहे. त्यांना दोन मुले आहेत राशा आणि रणबीरवर्धन. छाया एअर होस्टेस आणि पूजा इव्हेंट मॅनेजर आहे.

हे ही वाचा-

वडीलांच्या निधनामुळे अमेरिकेतून थेट राजकारणात एन्ट्री, सलग ९ वेळा अर्थसंकल्प मांडणारे एकमेव अर्थमंत्री, वाचा..

शहीद जवानाच्या कुटुंबासाठी गावाने दाखवली कृतज्ञता; एका रात्रीत उभे केले १ लाख ९१ हजार

कोरोना नियम मोडणाऱ्यांना मध्यप्रदेशात भलतीच शिक्षा; लिहायला लावतात भगवान श्रीरामाचे नाव

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.