दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपुढेही झुकली दिल्ली! आंदोलकांच्या मागण्यांना यश

सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन केले होते. हे आंदोलन आता रविकांत तुपकर यांनी स्थगित केले आहे.

केंद्र व राज्य सरकारने बऱ्याच मागण्या मान्य केल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी हा मोठा वियज असल्याचे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. गेल्या चार दिवसांपासून रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन केले होते.

आज जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या स्थलला भेट दिली. तसेच त्यांच्यासोबत चर्चा केली. रविकांत तुपकरांच्या आंदोलनाने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे शासनाने याची दखल घेतली आहे.

तुपकर यांनी फेसबूक पोस्ट करत मागण्या पूर्ण केल्याचे म्हटले आहे. अन्नत्याग आंदोलनाला, शेतकऱ्यांच्या एकजूटीला यश आले आहे, असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. यासंबंधी रविकांत तुपकर यांनी फेसबूकवर पोस्ट केली आहे.

फेसबूक पोस्ट-
अन्नत्याग आंदोलनाला यश…शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय…
सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी मी गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहे. केंद्र व राज्य सरकारने आता बऱ्याच मागण्या मान्य केल्या आहेत.

केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आदरणीय राजू शेट्टी साहेबांशी फोनवरून चर्चा केली व यानंतर सोयापेंड देशात आयात करणार नाही, याबाबत पुढील आठवड्यात आदेश करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच शरद पवार साहेबांनीही सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या मागण्या माझ्याकडून समजून घेतला व यासंदर्भात दिल्लीत संबंधित मंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन दिले आहे.

दरम्यान आज देवेंद्र फडणवीस साहेबांचाही फोन आला होता. त्यांनीही तात्काळ केंद्रीय कृषीमंत्री व वाणिज्य मंत्र्यांसोबत बैठकीचे त्यांनी आश्वासन दिले. राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी दि. २४ नोव्हेंबर रोजी बैठकीचे निमंत्रण दिले आहे व मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

अजितदादांच्या अध्यक्षतेखाली २४ नोव्हेंबरला ही बैठक पार पडणार आहे व या बैठकीला संबंधित खात्याचे मंत्री व सचिव उपस्थित राहणार आहेत. राज्य सरकारसोबत बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी मध्यस्ती केली,याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार! माझे शेतकरी बांधव व माध्यमांचेही मनापासून आभार!

महत्वाच्या बातम्या-
तुषार गांधीचे कंगनाला सडेतोड प्रत्युत्तर; थप्पड खाण्यासाठी दुसरा गाल पुढे करणे धाडसाचे, सगळ्यांना नाही जमत
वानखेडेंची बाजू भक्कम, त्यांना काही होणार नाही; प्रकाश आंबेडकरांनी दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
सुनावनी दरम्यान घडले असे काही की पोलीसांनी न्यायाधीशांना चेंबरमध्ये जाऊन चोपले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.