एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत ४० आमदारांना आपल्यासोबत नेले होते. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. पण विरोधी पक्षाकडून वारंवार बंडखोर आमदारांवर टीका केली जाते. आता पुन्हा एकदा विरोधी पक्षातील नेत्याने बंडखोर आमदारावर निशाणा साधला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ते खुपच आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. गुलाबराव पाटील गुवाहटीला काय शेण खायला गेले होते का? असा सवाल रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे.
तसेच रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची प्रतिष्ठा घालवली आहे. ते उठसुठ कोणालाही फोन लावतात. मुख्यमंत्र्यांचा सरपंच झालाय, असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.
रविकांत तुपकर आणि त्यांचे सहकारी तुरुंगातून आले आहे. त्यानंतर त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे. रविकांत तुपकर हे गुरुवारी बुलढाण्यात गेले होते. तिथे कार्यकर्त्यांचे त्यांचे धुमधडाक्यात स्वागत केले आहे. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर आणि एकनाथ शिंदेवर जोरदार हल्लाबोल केला.
गुलाबराव पाटील यांनी रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला नौटंकी आंदोलन म्हटले होते. आता तुपकर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी यावर उत्तर दिले आहे. तुम्ही गुवाहटली शेण खायला गेले होते का? तुम्ही पानटपरी चालवायचे असे असतानाही ठाकरेंनी तुम्हाला मंत्री केलं. तुम्ही त्यांच्याशीच गद्दारी केली, असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सरपंच झाला आहे. ज्याप्रमाणे सरपंच याला फोन लाव त्याला फोन लाव, नाल्यात पाणी गेले की फोन लाव, ते कोणालाही फोन लावतात. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पदाची गरिमा घालवली आहे, असा टोला रविकांत तुपकर यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
नाकात नळी, बाजूला सिलेंडर, गंभीर आजारी अवस्थेत व्हीलचेअरवर भाजपच्या प्रचारासाठी बापट मैदानात
‘हे’ दोन प्रश्न विचारत सुप्रीम कोर्टाने वाढवलं शिंदे गटाचं टेंशन, संपुर्ण प्रकरणाचा रोखच टाकला बदलून
मुंबईतील फेमस ‘मुच्छड पानवाला’च्या दुकानावर पोलिसांची धाड; सापडलं भलंमोठं घबाड