रवी शास्त्रींनी दिला होता विराटला कर्णधारपद सोडण्याचा सल्ला; बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानेच केला मोठा खुलासा

१६ सप्टेंबरला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी २० चं कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले होते. टी-२० विश्वचषकानंतर तो कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती त्याने दिली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने ही माहिती दिली होती.

विराटच्या अशा निर्णयामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे. अशातच एक हैराण करणारी माहिती समोर आली आहे. विराटला कर्णधारपद सोडण्याचा सल्ला मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिला होता. विशेष म्हणजे रवी शास्त्रींनी विराटला वनडेचे कर्णधारपद सोडण्याचाही सल्ला दिला होता.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने याबद्दलची माहिती दिली आहे. रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्यात कर्णधारपदाबाबत काही महिन्यांपूर्वी चर्चा झाली होती. असे त्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

विराटने त्याच्या खेळावर म्हणजेच फलंदाजीवर जास्त लक्ष देण्यासाठी त्याने मर्यादीत सामन्यांच्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा, असे शास्त्रींनी सांगितले होते. त्यानंतर आता विराटने टी २० संघाचे कर्णधारपद सोडले आहे, असे अधिकाऱ्याने म्हटले आहे.

विराट २०१७ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या जागी भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार बनला होता. कोहलीने ९० टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने २८ अर्धशतकांसह ३१५९ इतक्या धावा केल्या आहे. त्याने यापैकी ४५ सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद सांभाळले आहे.

त्यापैकी २७ सामन्यांमध्ये त्याने संघाला विजय मिळवून दिलाय तर १४ सामन्यांमध्ये संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, टी २० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. अशात कर्णधार म्हणून विराटचे हे शेवटचे टी २० चषक असणार आहे. त्यामुळे विराटवर ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रचंड दबाव असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

अरे बापरे! ८ लाख ८० हजारांना विकला गेला द्राक्षांचा एक घड, काय आहे खासियत, वाचा..
VIDEO; अभिनेत्री मलायका अरोराने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; म्हणाली अर्जुन कपूर बेस्ट किसर..
सोमय्यांनी पवारांवर आरोप करणे थांबवावे नाहीतर फौजदारी कारवाई करणार; राष्ट्रवादी आक्रमक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.