सुर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान का नाही? रवी शास्त्री म्हणाले…

दिल्ली | सुर्यकुमार यादवला भारतीय संघात जागा मिळणार की नाही? रवी शास्त्री यांनी पहिल्यांदाच दिले उत्तर

दिल्ली | या आयपीएलच्या हंगामातील सुर्यकुमार यादवची कामगिरी खूप कौतुकास्पद आहे. गेल्या हंगामातसुद्धा त्याने चांगली कामगीरी बजावली होती. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने अनेकवेळा डाव सावरत सामना जिंकून दिला आहे.

त्यामुळे अनेक क्रिकेट प्रेमींना हा प्रश्न पडला होता की, सुर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान का दिले गेले नाही? चार ते पाच दिवसांपूर्वी हा मुद्दा सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी खूप उचलून धरला होता.

गेल्या तीन हंगामापासून सुर्यकुमार यादव उत्तम कामगीरी बजावत आहे. नेटकऱ्यांनी BCCI वर संताप व्यक्त केला होता. पण आता यावर रवी शास्त्री यांनी मौन सोडले आहे. त्यांनी ट्विट करून सांगितले आहे की, सध्या टीम इंडियामध्ये अनेक चांगले आणि तरुण खेळाडू आहेत.

अशा परिस्थितीत ३० वर्षांच्या खेळाडूला संघात स्थान मिळणे कठीण आहे. म्हणून मी तरुण खेळाडूंना सय्यम राखण्याचा सल्ला देत आहे. एवढंच काय सुर्यकुमारसारखे आणखी ३ ते ४ खेळाडू आहेत ज्यांनी चांगली कामगिरी केली तरी त्यांना भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही.

जेव्हा संघात अनुभवी आणि तरुण खेळाडू भरलेले असतात अशावेळी इतर खेळाडूंना संधी देणं अवघड असतं असे रवी शास्त्री म्हणाले आहेत. दरम्यान, मुंबई इंडियन्स सध्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. यामध्ये सुर्यकुमार यादवचे बरेच योगदान आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी अर्णब गोस्वामींवर केले ‘हे’ गंभीर आरोप; प्रकरण चिघळलं 
 …तर माझा नवरा आज जिवंत असता; अन्वय यांच्या पत्नीचा अर्णब गोस्वामींवर आरोप
…त्यामुळे शक्ती कपूर यांनी श्रद्धाला फरहानच्या घरातून फरफटत बाहेर काढले होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.