Share

रवी शास्त्रींनी भारतासाठी शोधला नवीन वेगवान गोलंदाज, म्हणाले, ‘हा फलंदाजांसाठी ठरेल डोकेदुखी’

आयपीएलमुळे भारतातील अनेक नवोदित खेळाडूंना संधी मिळाली आहे. काही खेळाडूंनी या संधीचे सोने करत भारतीय क्रिकेट टीममध्ये प्रवेश मिळवला होता. हार्दिक पंड्या, इशान किशन आणि रिषभ पंत यांसारखे खेळाडू पहिल्यांदा आयपीएलमध्ये झळकले होते. त्यानंतर त्यांचा भारतीय क्रिकेट टीममध्ये समावेश करण्यात आला.(ravi shastri find this new bowler)

आता पुन्हा एकदा असाच एक खेळाडू चर्चेत आला आहे. उमरान मलिक असे या खेळाडूचे नाव आहे. सनरायझर्स हैदराबाद(Sunrisers Hyderabad) संघाकडून गोलंदाजी करणाऱ्या या खेळाडूची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री देखील उमरान मलिकच्या गोलंदाजीने प्रभावित झाले आहेत. उमरान मलिकमध्ये भारताकडून खेळण्याची क्षमता आहे, असे वक्तव्य रवी शास्त्री यांनी केलं आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने अप्रतिम कामगिरी केली. या सामन्यात उमरान मलिकने४ षटकात ३९ धावा देत २ बळी घेतले. या युवा गोलंदाजाने जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कलसारख्या दिग्गज फलंदाजांना बाद केले. या सामन्यात उमरान मलिकने काही षटकात १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली.

त्याच्या या कामगिरीचे भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कौतुक केले आहे. एका मुलाखतीत रवी शास्त्री म्हणाले की, “उमरान मलिक हा सातत्यपूर्ण खेळाडू आहे. या मुलाकडे नैसर्गिक गती आहे. जर या मुलाने योग्य ठिकाणी गोलंदाजी केली तर हा फलंदाजांची मोठी डोकेदुखी ठरेल. त्याच्या क्षमतेबद्दल शंका नाही. तो भारतासाठी खेळणारा खेळाडू आहे.”

रवी शास्त्री पुढे म्हणाले की, “तो उच्च स्तरावर खेळण्यास कधी तयार होईल, हे आताच सांगता येणार नाही. पण या खेळाडूची काळजी घेतली पाहिजे. जेव्हा हा खेळाडू भारतीय संघासाठी खेळेल. तेव्हा तो स्टार खेळाडू म्हणून ओळखला जाईल. या खेळाडूला आता वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळाले पाहिजे. ज्यामुळे त्याला योग्य दिशा मिळेल.”

२२ वर्षीय उमरान मलिक मूळचा जम्मू-काश्मीर राज्यातील श्रीनगर येथील रहिवाशी आहे. आयपीलच्या मागील हंगामापासून उमरान मलिक चर्चेत आला होता. गेल्या वर्षी टी-२० विश्व्चषकासाठी टीम इंडियाने त्याची नेट गोलंदाज म्हणून निवड केली होती. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात उमरान मलिकने उत्तम गोलंदाजी करत छाप पाडली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मिलिंद गवळी यांना अभिनयात यश मिळावं, यासाठी त्यांच्या सासूबाई करायच्या ‘हे’ काम; अभिनेत्याने सांगितला किस्सा
कॅनडामध्ये मराठमोळ्या अभिनेत्याचा डंका; आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावत उंचावली भारताची मान
काय सांगता! या पेनी स्टॉकमुळे ८ लाखांचे झाले ३ कोटी; ३ वर्षात दिला तब्बल ३५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now