भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री(Ravi Shastri) यांनी नुकताच त्यांच्या ऑडी कारचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहेत. १९८५ च्या बेन्सन आणि हॅजेस वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये केलेल्या कामगिरीचे बक्षीस म्हणून रवी शास्त्री यांनी ही ऑडी कार मिळाली होती. (Ravi Shastri became emotional after seeing his Audi car)
३७ वर्षांनंतर जुन्या लूकमध्ये त्यांची ऑडी कार पाहून रवी शास्त्री भावुक झाले. सुपर कार क्लब ऑफ इंडियाने ही मौल्यवान ऑडी कार पुन्हा त्याच जुन्या लूकमध्ये परत आणली आहे. गौतम सिंघानिया यांनी ही विंटेज ऑडी १०० कार भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडे सुपूर्द केली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या कारचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. तसेच रवी शास्त्री यांनी या कारसंदर्भात एक ट्विट देखील केलं आहे. त्या ट्विटमध्ये रवी शास्त्री यांनी लिहिले की, “१९८५ मध्ये जसं होतं, सर्व काही तसेच आहे. मी ऑडी कार चालवतो आणि ते भावनिक क्षण! ही सगळी देशाची संपत्ती आहे”, अशा आशयाचं ट्विट रवी शास्त्री यांनी केलं आहे.
या ट्विटसोबत रवी शास्त्री यांनी कारसोबतचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाने १९८३ चा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर दोन वर्षांनी १९८५ च्या विश्व क्रिकेट स्पर्धेत भारताने सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता.
https://twitter.com/RaviShastriOfc/status/1532676764375339018?t=TE9UzvC0LV_gmJ6HZjBGag&s=08
या विश्व क्रिकेट स्पर्धेत रवी शास्त्री यांनी अप्रतिम कामगिरी केली होती. या स्पर्धेतील पाच सामन्यांमध्ये रवी शास्त्री यांनी ४५.५० च्या सरासरीने १८२ धावा केल्या होत्या. तसेच आठ बळी देखील घेतले होते. या कामगिरीसाठी त्यांना सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले होते. यावेळी बक्षीस म्हणून रवी शास्त्री यांना ऑडी १०० ही कार देण्यात आली होती.
त्यावेळी भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी ही ऑडी १०० कार मैदानात चालविली होती. त्यावेळी ऑडी १०० कार लोकांमध्ये खूप प्रसिद्ध होती. या कारला भारतात आणण्यासाठी रवी शास्त्री यांना खूप अडचणी आल्या होत्या. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी ही कार भारतात आणण्यासाठी कर माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला होता.
महत्वाच्या बातम्या :-
अभिनय नाही तर ‘ह्या’ क्षेत्रात मास्टर आहे अशोक सराफ यांचा एकूलता एक मुलगा; वाचा त्याच्याबद्दल
भाजपचे आमदार सतेज पाटलांच्या संपर्कात? वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ
एकता कपूरच्या यशामागे आहे अशोक सराफ यांचा हात, एकताने सांगितले खरे कारण…