Share

Ravi Rana : राणा विरूद्ध पोलिस संघर्ष पेटला; रवी राणा बदला घेणार, पोलिस आयुक्तांना दिला ‘हा’ इशारा

Ravi Rana

Ravi Rana : काही दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये लव्ह जिहाद प्रकरणावरून मोठा गोंधळ झाला होता. अमरावती येथील एका मुलीला तिच्या पतीने डांबून ठेवल्याची नवनीत राणांची तक्रार होती. या प्रकरणावरून त्यांनी अमरावती पोलिसांवर गंभीर आरोपही केले होते.

त्यांनतर पोलिसांनी सातारा येथून त्या मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी नवनीत राणांचा फोन कॉल रेकॉर्ड केला अशी तक्रार त्यांनी केली होती. यावरून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये खूप गोंधळ घातला होता. त्यानंतर त्या मुलीचा शोध लागला.

संबंधित मुलीने मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे घर सोडून गेली होती, असे पोलिसांना सांगितले. तसेच माझ्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, असेही तिने सांगितले. तसेच नवनीत राणांनी हुज्जत घातलेल्या पोलिसाच्या कुटुंबीयांनीदेखील राणांवर आपला संताप व्यक्त केला.

एकदा पोलिसांचे प्रोटेक्शन न घेता जनतेत येऊन दाखवा. पोलीस हे त्यांच्या मेहनतीने इथपर्यंत आले आहेत, तुमच्यासारखे लोकांना किराणा वाटून नाही. त्यामुळे तुमचा माज कमी करा, अशा शब्दांत पोलिसांच्या कुटुंबीयांनी नवनीत राणांना सुनावले होते.

तसेच अमरावती येथील पोलीस आयुक्त आरती सिंग यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ती मुलगी स्वतःच्या मर्जीने घर सोडून निघून गेली असल्याचे त्यांनी म्हटले होते. या सर्व प्रकरणावर अमरावतीचे आमदार व नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर निशाणा साधला आहे.

त्या मुलीचा पत्ता लागण्यात अमरावती पोलिसांची कुठलीच कामगिरी नाही. सातारा रेल्वे पोलीस व सातारा पोलिसांनी त्या मुलीला शोधून काढले आहे. या प्रकरणात आरती सिंग यांचा काहीही संबंध नाही. आरती सिंग यांनी उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये केवळ वसुली करण्याचे काम केले आहे.

मात्र,आता त्यांचे हे वसुली पथक शिंदे-फडणवीस सरकारमध्ये बंद होणार आहे, असे रवी राणा म्हणाले आहेत. तसेच गणपतीनंतर आरती सिंग यांची उचलबांगडी करणार असल्याचेही रवी राणा यांनी म्हटले आहे. ते अमरावतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde : दररोज ५० मंडळांना भेट देऊन, बाप्पांचे दर्शन घेऊन एकनाथ शिंदेंनी साध्य केले ‘हे’ दोन हेतू
Bindass Kavya : अखेर बिंदास काव्याचा पोलिसांनी लावला छडा, ‘या’ कारणामुळे सोडले होते घर, वाचून हैराण व्हाल
Uddhav Thakarey: उद्धव ठाकरे मेमन कुटुंबियांवर एवढे मेहेरबान का?, जनाब सेनेचा कांगावा उघड झालाय
Devendra Fadanvis : आमच्या सरकारमध्ये हिंमत होती म्हणून.., याकूब मेमन प्रकरणावर फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now