रवी किशनच्या मुलीसमोर ऐश्वर्या, दिपीका पडतील फिक्या, दिसायला आहे खुपच हॉट; पहा फोटो

सध्या बॉलीवूडमध्ये स्टार किड्सचा जमाना आला आहे. कोणत्याही अभिनेत्यांपेक्षा जास्त भाव त्यांच्या मुलांना दिला जातो. जान्हवी कपूर, आलिया भट्ट, सारा अली खान आणि अनन्या पांडे असे अनेक स्टार किड्स बॉलीवूडमध्ये कार्यरत आहेत.

या यादीत एका नावाचा समावेश होणार आहे. या स्टार किडचे वडील फक्त बॉलीवूड नाही तर साऊथ आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये पण खुप जास्त प्रसिद्ध आहेत. हे स्टार भोजपुरी चित्रपटातील सुपरस्टार रवी किशन आहेत.

आपण आजपर्यंत रवी किशनला मोठ्या पडद्यावर अभिनय करताना पाहिले आहे. पण आत्ता रवी किशनसोबतच त्यांची मुलगी देखील मोठ्या पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहे. रिवा किशनने अभिनय क्षेत्रात डेब्यु केला आहे.

रिवाला दिसायला खुपच सुंदर आहे. तिच्यासमोर बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्री फिक्या पडतात. ती बाहेर देशातून तिचे शिक्षण पूर्ण करत आहे. रिवाचे शिक्षण अजून पुर्ण झाले नाही. शिक्षण करता करता रिवा अभिनय क्षेत्रात आली आहे.

रिवाने ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात डेब्यु केला आहे. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला नाही. परंतु रिवाला मात्र या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. ती तिच्या पुढच्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहे.

रवी किशनला ज्यावेळी त्यांच्या मुलीच्या बॉलीवूड डेब्युबद्दल विचारण्यात आले त्यावेळी त्यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, ‘रिवा मला लहानपणापासून अभिनय करताना बघ आहे. त्यामूळे तिला अभिनयाची जाणीव आहे. रिवाचे अभिनय क्षेत्रातील भविष्य उज्वल आहे’.

रिवाला ज्यावेळी तिच्या डेब्युबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी ती म्हणाली की, ‘मला याबद्दल माहिती नव्हते. मला माझ्या वडिलांच्या मित्राने फोन केला आणि या चित्रपटाबद्दल माहिती दिली. मी आनंदी आहे की, मला बॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे’.

रवी किशनने फक्त हिंदी नाही तर अनेक भाषांच्या चित्रपटामध्ये काम केले आहे. सगळीकडेचं त्यांच्या अभिनयाची खुप जास्त प्रशंसा केली जाते. अभिनयासोबतच रवी किशन यांनी राजकारणात देखील चांगले नाव कमवले आहे.

रवी किशन यांचा बॉलीवूड ते भोजपुरी सिनेमा आणि भोजपुरी सिनेमा ते राजकारण हा प्रवास सोपा नव्हता. १९९० साली रवी किशन फक्त ५०० रुपये घेऊन जोधपूरवरून अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे फक्त ५०० रुपये आणि त्यांचा अभिनय या दोनच गोष्टी होत्या.

पण त्यांनी कधीही हार मानली नाही. अनेक वर्षे फिल्म इंडस्ट्रीमध्ये मेहनत करत राहिले. ‘तेरे नाम’ चित्रपटापासून त्यांना बॉलीवूडमध्ये प्रसिद्धी मिळाली. पण काम मिळत नव्हते. त्यांनी खुप प्रयत्न केले. पण बॉलीवूडने त्यांचा स्वीकार केला नाही.

शेवटी त्यांनी भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. भोजपुरी सिनेमाने त्यांना नाव, पैसा आणि प्रसिद्धी या तिन्ही गोष्टी दिल्या. रवी किशन भोजपुरी सिनेमातील सुपरस्टार आहेत. त्यांना भोजपुरी सिनेमातील अमिताभ बच्चन देखील बोलले जाते.

महत्त्वाच्या बातम्या –

कंगणाने आता घेतला थेट टाटांशी पंगा; लव्ह जिहादच्या मुद्यावर भिडली

खळबळजनक! ‘त्या’ कामासाठी अभिनेत्रीने अभिनेत्यासमोर काढला अंगातला शर्ट; व्हिडीओ व्हायरल

तुम्हाला माहितीय? भारतातील जातीप्रथा संपवण्यासाठी वाघ बकरी चहा सुरू करण्यात आला होता

कारगिल युद्धात जीवाची बाजी लावत जवानांचे प्राण वाचवणारी रणरागिनी; वाचा थरारक किस्सा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.