ravi godse on corona third wave | देशात पुर्णपणे कोरोनाचे वातावरण शांत झालेले आहे. कोणतेही बंधन आता राहिलेली नाही. पुन्हा आधीसारखी सुरुवात होताना दिसून येत आहे. असे असताना आता चीनमधून पुन्हा कोरोना पसरत असल्याच्या बातम्या येत आहे. चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातल्याचे म्हटले जात आहे.
दवाखाने पुर्णपणे भरलेले असून काही लोक तर खाली झोपून उपचार घेत असल्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आहे. त्यामुळे भारतातही पुन्हा कोरोना येणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यावर आता डॉय रवी गोडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रवी गोडसे यांनी दिलासादायक माहिती दिली आहे. या कोरोनाला काहीही घाबरण्याची गरज नाहीये, असे रवी गोडसे यांनी म्हटले आहे. पहिल्या दुसऱ्या लाटेत भारतीय लोकांनी कोरोनाच्या लसी घेतल्या आहेत, त्यामुळे भारताला घाबरण्याची गरज नाही, असे रवी गोडसे यांनी म्हटले आहे.
कोरोनाला अजिबात घाबरु नका. निधड्या छातीने त्याला सामोरे जा. एखाद्या गुराला ३ महिन्यांपासून बांधून ठेवलं तर तो जोर दाखवणारंच ना. याआधीही आपण त्याचा सामना केला आहे. आपण लसी घेतल्या आहेत. एक-दोन नाही तर तीन तीन डोस लोकांनी घेतले आहे. मग घाबरण्याची गरज नाही, असे रवी गोडसे यांनी म्हटले आहे.
काहीही होणार नाही, काहीही करु नका. सर्व काही करुन झालेलं आहे. म्हणून चीनमधून येणाऱ्या या कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. कोरोनामध्ये लोकांना बेड मिळत नसले तरी तो चीन आहे. तुम्ही त्यांची काळजी करु नका. आपण आधीही कोरोनाशी भिडलो आहोत, त्यामुळे या कोरोनाला घाबरण्याची गरज नाही, असे रवी गोडसे यांनी म्हटले आहे.
तो अधूनमधून येतच राहणार. त्याचे सतत लाड नको करायला. तो आता आला तरी एवढे भयानक रुप दाखवणार नाही. त्यामुळे आपल्याला काहीच काळजी करायची गरज नाही. कोरोना येतोय म्हणून अजिबात ताण घेऊ नका, असेही रवी गोडसे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
shivsena : एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, संजय राऊतांना जामीन मिळवून देणाऱ्या नेत्यालाच घेतलं आपल्या गटात
bjp : फडणवीसांनी शिंदेंसोबत केली मोठी खेळी, शिंदे गटात जाणाऱ्या ‘या’ बड्या नेत्यालाच ओढलं भाजपात
mahavikas aghadi : “राज्यात महाविकास आघाडीच पहिल्या क्रमांकावर, भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दावे खोटे”