‘या’ पाच सुचनांचे पालन केले तर कोरोना जुलैमध्ये संपेल; प्रसिद्ध डाॅक्टरचे केंद्राला आवाहन

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या संकटाने थैमान घातले आहे. सध्या दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. पण कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे देशभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

अशातच एका डॉक्टरांनी आपण सांगितलेल्या पाच गोष्टींचा अंबलबजावणी केल्यास जुलैमध्ये कोरोना संपेल. त्यामुळे लोकांना मास्का लावायची गरज पडणार नाही आणि तिसऱ्या लाटेचाही धोका राहणार नाही, असे भारतीय वंशाचे अमेरिकेतील डॉक्टर असलेले रवी गोडसे यांनी म्हटले आहे.

डॉ. गोडसे हे वैद्यकिय तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. कोरोनाबाबत त्यांनी याआधीही अनेक व्हिडिओंमधून सुचना दिलेल्या आहे. आता त्यांनी सरकारला पाच सुचना केल्या आहे. त्यांचे पालन केले तर येत्या १ जुलैपर्यंत भारतातील कोरोना संपेल. तसेच ऑक्टोबरपर्यंत लोकांना मास्क वापरण्याची गरज पडणार नाही, असा दावा डॉ. गोडसे यांनी केला आहे.

१.दररोज पत्रकार परिषद घेऊन जनतेला कोरोनाबद्दल अधिकृत माहिती द्या.

२. जेवढ्या काही लसी मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत, त्या सर्वांच्या आपत्कालीन वापराला मंजुरी द्या.

३. लसीकरण असेल किंवा कोरोनावरील उपचार. खाजगी क्षेत्रालाही या कामात मंजुरी द्या. त्यामुळे या कामाला गती मिळेल.

४. प्रोटोकॉलनुसार मोनोक्लोनल प्रक्रियेला परवानगी द्यावी. त्यामुळे कोरोनाचा नियंत्रणात येईल. अमेरिकेत मोनोक्लोनला गेल्याचवर्षी परवानगी देण्यात आली होती.

५. सरकारने लाल फितीचा कारभार बंद करावा आणि सर्वांचे लसीकरण करावे.

अशा पाच सुचना डॉ. रवी गोडसे यांनी सरकारला केल्या आहे. तसेच मी दिलेल्या तारखा खोट्या ठरवायच्या नसतील, तर या नियमांचे सरकाराने पालन करावे, असेही डॉ. रवी गोडसे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

शाहरुखचा मुलगा अब्रामची आई गौरी खान नाहीये, तर कोण आहे माहितीये का?
धक्कादायक! ताशी ११० किलोमीटर भरधाव वेगाने धावली ट्रेन; स्टेशन मागची इमारत झाली जमीनदोस्त
डोक्यावर पदर घेऊन ही महिला चालवतेय लक्झरी; व्हिडिओ पाहून तुम्हाला पण वाटेल गर्व

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.